शहापूर : पाणी, रस्ते, आरोग्य,गटारींची दुरवस्था आदी विविध समस्यांबाबत बुधवारी भाजपाचे ठाणे जिल्ह्याचे विभागीय उपाध्यक्ष संतोष शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी किरण मोरे यांना घेराव घातला. मुख्याधिकारी मोरे हे कार्यालयात बसलेले असल्यामुळे त्यांना बाहेर बोलवा असे आंदोलनकर्ते मागणी करत होते. परंतु तहसीलदार रवींद्र बाविस्कर, पोलीस निरीक्षक संजय धुमाळ आदींनी चर्चेकरिता आपले शिष्टमंडळ यावे असे सांगितले. परंतु ते अमान्य करत मुख्याधिकाऱ्यांनीच समोर यावे असा आग्रह धरल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते. अखेर मुख्याधिकारी पोलीस संरक्षणात आंदोलनकर्त्यांना सामारे गेले. त्याचवेळी शिवसेनेचे विजय भगत, सुभाष विशे, मिलिंद भोईर, सागर सावंत, अजित आळशी आनंद अधिकारी,सचिन तावडे आदी नगरसेवक मुख्याधिकाऱ्यांच्या बाजूने उभे राहिले. यावेळी भाजपाचे संतोष शिंदे, अरु ण कासार, विवेक नार्वेकर यांची प्रश्नांची सरबत्ती सुरु च होती. अखेर नगराध्यक्षा योगिता धानके यांनी ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर पंचायतीमध्ये झाल्यानंतर ज्या कार्यपद्धतीत कामे व्हायला पाहिजे त्याच कार्यपद्धतीत कामे होत आहेत. परंतु त्यास थोडा विलंब होतो असे सांगत आंदोलनकर्त्यांना चर्चेला कार्यालयात बोलावले. यावेळी झालेल्या चर्चेत एका इमारतीला तीन नळजोडणी दिली असताना २० सदनिकाधारकांकडून पाणीपट्टीची होत असलेली वसुली, पाण्याच्या टाकीचा प्रश्न, गावातील साफसफाई, पुरुषोत्तम अर्जुन हॉलमध्ये थाटलेले कार्यालय व अनिधकृत बांधकामावर चर्चा झाली. (वार्ताहर)
भाजपा कार्यकर्त्यांचा मुख्याधिकाऱ्यांना घेराव
By admin | Updated: February 16, 2017 01:55 IST