शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

युतीचा ११० जागांवर विजयाचा दावा; भाजपचा सन्मान राखण्याची ठाण्यात केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 08:58 IST

शिंदेसेना आणि भाजपमध्ये पार पडलेल्या युतीच्या पहिल्याच बैठकीत दोन्ही पक्षांकडून ११० जागांवर विजयाचा दावा करण्यात आला.

ठाणे : शिंदेसेना आणि भाजपमध्ये पार पडलेल्या युतीच्या पहिल्याच बैठकीत दोन्ही पक्षांकडून ११० जागांवर विजयाचा दावा करण्यात आला. भाजपच्या कार्यालयात दोन्ही पक्षांच्या समन्वय समितीची बैठक बुधवारी झाली. महायुतीच्या घटक असलेल्या अजित पवार गटाला मात्र बैठकीला पाचारण केले नव्हते.

ठाण्यात शिंदेसेनेकडे जास्त माजी नगरसेवक असल्याने त्यांनी जागावाटपात योग्य तो सन्मान राखावा, अशी अपेक्षा भाजपच्या नेत्यांनी व्यक्त केली. पुढील बैठकीत शिंदेसेना जागा वाटपाचा प्रस्ताव देणार आहे. ठाणे महापालिका निवडणुकीत ११० हून अधिक जागांवर विजय मिळेल व महायुतीचा भगवा फडकेल, महापौर महायुतीचाच बसेल, असा दावा दोन्ही पक्षांनी केला.

या बैठकीत शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्के, महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे, राम रेपाळे आणि पूर्वेश सरनाईक उपस्थित होते, तर भाजपकडून आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, शहराध्यक्ष संदीप लेले आणि संजय वाघुले हे पदाधिकारी उपस्थित होते. सव्वातास चाललेल्या या बैठकीत महायुतीचे अधिक नगरसेवक कसे निवडून येतील, याबाबतच्या रणनीतीवर चर्चा झाली.

बंडखोरी टाळण्याकरिता दोन्ही पक्षांनी कसोशीने प्रयत्न करायचा व अधिकृत उमेदवारांच्या विजयाकरिता संयुक्तपणे प्रयत्न करण्याचा निर्धार करण्यात आला. ठाण्यात शिंदेसेनेकडे अधिक संख्येने माजी नगरसेवक असल्याने सिटिंग गेटिंग फॉर्म्युल्यानुसार ते जास्त जागांवर दावा करतील. मात्र, जागावाटपात भाजपचा योग्य तो सन्मान राखावा, अशी मागणी भाजपने केली. या

अजित पवार गट स्वबळावर

दोन दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष नजीब मुल्ला यांनी स्वबळाचा नारा दिला. वरिष्ठ पातळीवर भाजपसोबत न जाण्याचा निर्णय घेतला आहे. ठाण्यात अजित पवार गट स्वतंत्र लढणार आहे.

"जागा वाटपाबाबत कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नाही. केवळ निवडणुकीत अधिक नगरसेवक कसे निवडून येतील, त्याचा फॉर्म्युला ठरला. ठाणे महापालिकेवर महायुतीचाच भगवा फडकेल. पहिल्या बैठकीत अतिशय सकारात्मक चर्चा झालेली आहे."- संजय केळकर, आमदार, ठाणे शहर भाजप

"सकारात्मक चर्चा झाली. जागावाटपाचा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही. याठिकाणी मोठा भाऊ किंवा छोटा भाऊ अशी परिस्थिती नाही. महापालिका निवडणुकीत ११० हून अधिक नगरसेवक हे महायुतीचे निवडून येतील आणि महापौर महायुतीचाच बसणार आहे."- नरेश म्हस्के, खासदार, शिंदेसेना, ठाणे

English
हिंदी सारांश
Web Title : Alliance claims 110 seats; BJP seeks respect in Thane.

Web Summary : The Shinde Sena and BJP, in their first meeting, claimed victory in 110 seats. BJP leaders expect respect in seat allocation due to Shinde Sena's ex-corporators. Ajit Pawar's group plans to contest independently. Both aim for a unified victory.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूकThane Municipal Corporation Electionठाणे महापालिका निवडणूक २०२६