शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

वाढवणं बंदराच्या भूमिपूजना विरोधात राज्यातील सर्व मच्छिमार आंदोलन करणार

By धीरज परब | Updated: August 28, 2024 16:49 IST

मच्छीमारांचा वाढवण बंदरास विरोध असून आमच्या अस्तित्वासाठी शेवट पर्यंत सरकार विरुद्ध लढू असा इशारा देण्यात आला आहे.

धीरज परब

मीरारोड - पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदरचे भूमिपूजन ३० ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून त्याला विरोध करण्याचा निर्धार बुधवारी भाईंदरच्या उत्तन येथील मच्छिमार संघटनेच्या बैठकीत करण्यात आला आहे. मच्छीमारांचा वाढवण बंदरास विरोध असून आमच्या अस्तित्वासाठी शेवट पर्यंत सरकार विरुद्ध लढू असा इशारा देण्यात आला आहे.

अदानीसाठी मच्छीमार व स्थानिक भूमीपुत्रांना उध्वस्त करत वाढवण बंदर सत्तेच्या पाशवी बळावर लादण्याची ब्रिटिश वृत्ती सरकारची दिसत आहे. ह्या भूमिपूजन कार्यक्रमाला विरोध दर्शविण्याकरीता बुधवारी तातडीची सभा उत्तन येथे बोलाविण्यात आली होती अशी माहिती मच्छीमार नेते बर्नड डिमेलो यांनी दिली.

  सभेला मुंबई, ठाणे आणि पालघर येथील मच्छिमार सहकारी संस्थेचे पदाधिकारी तसेच मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र दामोदर तांडेल, कार्याध्यक्ष बर्नड डिमेलो, सरचिटणीस संजय कोळी, युवा अध्यक्ष मिल्टन सौदिया, उत्तन वाहतूक संस्थेचे चेअरमन विंसन बांड्या, उत्तन विकास संस्थेचे जॉन गऱ्या , वसई मच्छिमार संस्थेचे चेअरमन नाझरेथ गोडबोले, एडविन केळीखादया, जॉन्सन भयाजी, डिकसन डीमेकर, पास्कु मनभाट, स्टीफन कासुघर, डोंगरी चौक मच्छिमार संस्थेचे विलियम गोविंद, पास्कोल पाटील,  मनोरी मच्छिमार संस्त्थेचे चंद्रकांत फाजींदार,  पाली मच्छिमार संस्थेचे माल्कम कासुकर,  लीन्टन मुनिस, लॉरेन्स घोसाल, सचिन मिरांडा, भाटी मच्छिमार संस्थेचे जितेंद्र कोळी, उत्तन मच्छिमार विविध संस्थेचे अंतोनी ताण्या, किशोर कोळी, भाटेबंदर मच्छिमार संस्थेचे रुपेश डिमेकर आदी उपस्थित होते.

ह्या सभेत भूमिपूजनाचा कार्यक्रमाला एकमताने विरोध करण्याचा व वाढवण किनाऱ्यावर होणाऱ्या सरकारच्या प्रेत यात्रा आंदोलनात मोठ्या संख्येने मच्छिमार सहभागी होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे   पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या हस्ते होणाऱ्या वाढवण बंदराच्या भूमिपूजन सोहळ्यामुळे राज्यातील मच्छिमारांमध्ये कमालीची नाराजी पसरली असून ह्या भूमिपूजनाला राज्यातील मच्छिमार कडाडून विरोध करणार असल्याचा निर्धार मिल्टन सौदिया यांनी व्यक्त केला.  वाढवण बंदर उभारणीमुळे पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील ६० पेक्षा जास्त मच्छिमार गावांवर विपरीत परिणाम होणार असून लाखो मच्छिमार आपला व्यवसाय कायमस्वरूपी गमावणार आहेत.  मच्छिमार समाज आजतागायत कधीच विकासाच्या आड आला नाही. परंतु विकासाच्या नावाखाली मच्छिमारांचा व्यवसाय नष्ट  होत असेल तर ते कदापि सहन केले जाणार नाही आणि अश्या विध्वंसक प्रकल्पनां कडाडून विरोध हा समाज शेवट पर्यंत करत राहणार असल्याचे समितीचे संजय कोळी यांनी सांगितले.   मच्छिमारांचे कोण कोणत्या पद्धतीने नुकसान होणार ह्याचे सविस्तर चर्चा करण्यात आली.  ह्या प्रकल्पामुळे फक्त डहाणू तालुक्यातील मच्छिमार बाधित होणार नसून मुंबई, ठाणे, उत्तन, वसई, अर्नाळा, सातपाटी येथील मासेमारी व्यवसाय बाधित होणार आहे. कारण समुद्रातील एकूण ३० हजार एकर क्षेत्र मासेमारीसाठी प्रतिबंधित करण्यात येणार असल्याचे भारतीय मत्स्यकी संशोधन संस्थेच्या अहवालात स्पष्ट नमूद करण्यात आले असल्यामुळे ह्या प्रकल्पाला राज्यातील सर्व किनारपट्टीवरून  विरोध होणार असल्याचे समितीचे कार्याध्यक्ष बर्नड डिमेलो यांनी सांगितले.  वसई येथील मच्छिमार भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या विरोधात वसई तहसील कार्यालयावर मोर्चा नेणार  आहेत. उत्तन, मढ, मर्वे, गोराई येथील मच्छिमार समुद्रात काळे झेंडे दाखवून विरोध करणार आहेत.