शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील ‘त्या’ मारहाण प्रकरणातील सर्व आरोपींची जामीनावर सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 22:32 IST

वादग्रस्त पोस्ट केल्याच्या आरोपावरुन ठाण्यातील एका अभियंत्याला झालेल्या मारहाण प्रकरणातील सहाही आरोपींना ठाणे न्यायालयाने काही अटींवर तत्वत: जामीन मंजूर केला आहे. त्यांच्यापैकी दोघा कोरोनाग्रस्तांवर रुग्णालयात उपचार सुरु असून उर्वरित चौघांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

ठळक मुद्दे दोघांवर कोरोनाचे उपचार सुरुचौघांना ठेवले विलगीकरण केंद्रामध्ये

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर एका अभियंत्याला झालेल्या मारहाण प्रकरणातील सहाही आरोपींची तत्वत: जामीनावर सुटका झाली आहे. त्यांच्यापैकी दोघा कोरोनाग्रस्तांवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून उर्वरित चौघांना भार्इंदर पाडा येथील ठाणे महापालिकेच्या विलगीकरण केंद्रामध्ये ठेवण्यात आल्याची माहिती बुधवारी पोलीस सूत्रांनी दिली.मारहाण प्रकरणामध्ये आव्हाड यांचे निकटवर्तीय असलेल्या पाच जणांना वर्तकनगर पोलिसांनी सुरुवातीला ९ एप्रिल रोजी अटक केली होती. तर सहावा आरोपी ११ एप्रिल रोजी त्याच्या स्कॉर्पिओसह शरण आला होता. अटक होण्यापूर्वीच या सर्वांची कोरोनाची तपासणी करण्यात आली होती. या तपासणीचा अहवाल १२ एप्रिल रोजी आला. दरम्यान, या सर्वांना १३ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले होते. दोघांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे मात्र वर्तकनगर पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. ठाणे न्यायालयाच्या निदर्शनास ही बाब पोलिसांनी आणून दिल्यानंतर न्यायालयानेही सोमवारीच या सर्वांना काही अटी शर्थींवर तत्वत: जामीन मंजूर केला. त्यामुळे त्यातील दोघांना घोडबंदर रोडवरील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तर उर्वरित चौघेही त्या दोघांच्या संपर्कात असल्यामुळे त्यांचा ‘हायरिस्क’मध्ये समावेश झाला आहे. त्यांनाही विलगीकरण केंद्रात ठेवण्याचा सल्ला ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिला आहे. याच आरोपींच्या संपर्कात आल्यामुळे वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या १४ पोलीस कर्मचाऱ्यांना विलगीकरण केंद्रात तर आठ पोलिसांना होम कॉरंटाईन अर्थात घरातच विलगीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे एखादा आरोपी पकडण्यासाठी किंवा त्याला अटक करतांनाही पोलिसांना यापुढे मोठी खबरदारी घ्यावी लागणार आहे.

टॅग्स :thaneठाणेCourtन्यायालयCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस