शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

नितीन वारिंगे हत्येतील सर्व आरोपी निर्दोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 00:50 IST

अंबरनाथमधील शिवसेना नगरसेवक नितीन वारिंगे यांची २०११ मध्ये हत्या करण्यात आली.

अंबरनाथ : अंबरनाथमधील शिवसेना नगरसेवक नितीन वारिंगे यांची २०११ मध्ये हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी सहा आरोपींना अटक झाली होती. या प्रकरणाचा निकाल गुरुवारी कल्याण न्यायालयात लागला. या सहाही आरोपींना सबळ पुराव्याअभावी निर्दाेष सोडण्यात आले आहे. त्यातील एका आरोपीचा याआधीच अपघातात मृत्यू झाला आहे.वारिंगे यांचा भाचा समीर गोसावी याची २००९ मध्ये पेट्रोलपंपावर हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात भालचंद्र भोईर आणि त्यांच्या तीन भावांसह काही कुटुंबीयांना तुरुंगात जावे लागले होते. या हत्येचा पाठपुरावा वारिंगे करत असल्याने त्यांचा काटा काढण्यासाठी भोईर याने हत्येचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. ६ मे २०११ रोजी वारिंगे हे आपल्या इमारतीच्या बांधकामाची पाहणी करत असताना दोघांनी त्यांच्यावर गोळीबार करून पळ काढला. या हल्ल्यात वारिंगे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर वारिंगे यांचे कोणासोबत वैर होते, याची चाचपणी करण्यात आली. या तपासात भालचंद्र या तुरुंगात असलेल्या आरोपीवर संशय आला. या प्रकरणात पोलिसांनी तपास करताना महेंद्र केवट आणि दत्तात्रेय गायकवाड या दोघांना अटक केली.या दोघांनीच वारिंगे यांच्यावर गोळीबार केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. भालचंद्र याने तुरुंगात असताना त्याच्यासोबत असलेल्या सुमित येरुणकर याच्यासोबत मैत्री वाढवली. वारिंगे यांना मारण्याची सुपारी दिल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. तर, सुमितवर महेंद्र आणि दत्तात्रेय यांच्या मदतीने हत्येचा आरोप होता. या मारेकऱ्यांना नितीन ठाणगे आणि संतोष यादव या रिक्षाचालकाने मदत केल्याचा आरोप केला होता.>सात वर्षांनंतर निकालया प्रकरणात नितीन हा जामिनावर सुटलेला असताना अपघातात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा निकाल सात वर्षांनंतर कल्याण न्यायालयाने दिला आहे. वारिंगे यांच्या हत्या प्रकरणात सबळ पुरावा नसल्याने सर्व सहा आरोपींची निर्दोष मुक्तता केली.