शहरं
Join us  
Trending Stories
1
Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
2
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
3
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
4
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
5
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
6
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
7
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
8
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
9
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती
10
बांगलादेशींना नोकरी देणाऱ्यांवर होणार कारवाई; राज्य सरकारच्या आदेशात काय?
11
"तरुण दिसण्यासाठी ती गेली ५ वर्ष.."; शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी केला मोठा खुलासा
12
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
13
खराब हवामानामुळे पिकाचे होणारे नुकसान टाळता येणार, नव्या टेक्नोलॉजीचा शेतकऱ्यांना फायदाच!
14
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
15
Shefali Jariwala Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
16
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
17
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
18
११वी प्रवेशाचा घोळ थांबेना, विद्यार्थ्यांची चिंता मिटेना; तांत्रिक अडचणींचे ग्रहण सुटणार कधी?
19
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
20
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?

उल्हास नदीकाठच्या गावांना प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 23:58 IST

रायता येथील उल्हास नदीवरील पूल वाहतुकीसाठी बंद; कल्याण-मुरबाड-नगर वाहतूक अन्य मार्गाने, १२ गावांचा संपर्क तुटला, शेतीचे प्रचंड नुकसान

म्हारळ : पावसाने शुक्रवारी रात्रीपासून पुन्हा जोर धरल्याने कल्याण तालुक्यातील १० ते १२ गावांचा संपर्क तुटला आहे. उल्हास नदीची पातळी वाढल्याने रायता पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कल्याण-मुरबाड महामार्ग आठवड्यात तिसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक गोवेली-आंबिवली-शहाडहून कल्याण, अशी वळवण्यात आली.पावसामुळे आपटी, मांजर्ली, दहागाव, पोई, केळणी, वाहोली, बापसई, मामनोली, रायते, दहिवली, चौरे, अंताडे आदी गावांचा संपर्क तुटला. दुसरीकडे कल्याण-मुरबाड महामार्ग कांबा ते टाटा पॉवर हाउसदरम्यान दोनतीन फूट पाणी साचले होते. परिणामी, वाहतुकीवर परिणाम झाला. उल्हास नदीची पातळी वाढल्याने आणि भरतीमुळे सुरक्षेच्या दृष्टीने कल्याण-मुरबाड महामार्गावरील कल्याणकडून येणारी वाहतूक म्हारळ येथेच थांबण्यात आली. ही वाहतूक उल्हासनगरमार्गे वळवण्यात आली. तर, मुरबाडहून येणारी वाहतूक गोवेलीहून टिटवाळा-आंबिवली-शहाडमार्गे कल्याण अशी वळवण्यात आली. प्रशासनाने नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला होता. शासकीय यंत्रणेसोबत एनडीआरएफची टीमही अलर्ट होती.म्हारळ येथील सखल भागांतील म्हारळ सोसायटी, शिवानीनगर, बोडके चाळ, अण्णासाहेब पाटीलनगर, साईदीप कॉलनीत सकाळी पाणी भरले. त्यामुळे गटारांतील पाणी नागरिकांच्या घराघरांमध्ये घुसल्याने रहिवाशांचे हाल झाले. म्हारळमध्ये कचराकुंड्या नसल्याने ठिकठिकाणी कचºयाचे ढीग साचले आहेत. त्यामुळे वारंवार पावसाचे पाणी तुंबत असल्याने रोगराई पसरण्याचा धोका वाढतच असल्याचे मनसे कार्यकर्ते विवेक गंभीरराव यांनी सांगितले.शहाड येथेही सकाळी मोहना रोडवर दोन फूट पाणी आले. गटाराचे पाणी परिसरातील गुरु दर्शन, मधुसूदन, अंबिकानगर सोसायट्यांमध्ये गुडघाभर पाणी साठले होते. शिवाय, म्हारळ येथे वाहतूक थांबवल्याने शहाड पुलावर वाहनांच्या रांगा पाहावयास मिळाल्या. त्यामुळे शहाड-बिर्ला गेट येथे प्रचंड वाहतूककोंडी निर्माण झाली. दरम्यान, उल्हास नदीच्या पुराचे पाणी आपटी, मांजर्ली, आणे आणि रायते गावांतील शेतात शिरल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.मी स्वत: परिसरात फिरून परिस्थितीची पाहणी करीत आहे. एनडीआरएफची टीमही सतर्क आहे.- दीपक आकडे, तहसीलदार, कल्याण

टॅग्स :Rainपाऊस