शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथच्या एमपीएससी, यूपीएससी ट्रेनिंग सेंटरमध्ये पालिका कर्मचाऱ्यांची दारू पार्टी; 20 दिवसांनी व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 13:28 IST

हा सर्व प्रकार 28 फेब्रुवारी रोजी घडला असून त्याची व्हिडिओ क्लिप पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना आणि आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आली होती. मात्र पंधरा दिवस उलटल्यानंतर देखील या कर्मचार्‍यांवर कोणतीही कारवाई न झाल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

अंबरनाथ: अंबरनाथ नगरपालिकेने उभारलेल्या यूपीएससी ट्रेनिंग सेंटर मध्ये पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांची दारूपार्टी रंगल्याची बाब समोर आली आहे. याच यूपीएससी सेंटरमध्ये कोरोना काळात कोविड रुग्णालय उभारण्यात आले होते. त्याच ठिकाणी ही ओली पार्टी रंगल्याने पालिका प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागला आहे.

 अंबरनाथ नगरपालिकेने पूर्व भागात शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या समोरच एमपीएससी आणि यूपीएससी ट्रेनिंग सेंटर उभारले आहे. या प्रशस्त इमारतीत कोरोना काळात रुग्णालय सुरू करून अनेक रुग्णांचे जीव वाचवण्याचे काम करण्यात आले. याच यूपीएससी सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांनी चक्क लायब्ररीसाठी राखीव असलेल्या खोलीत दारूची पार्टी केल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे कल्याण डोंबिवलीचे नगरसेवक ही इमारत कशा स्वरूपाने बनवण्यात आली आहे ते पाहण्यासाठी अंबरनाथ मध्ये आलेले असताना ती इमारत दाखवण्यासाठी स्थानिक नगरसेवक सुभाष साळुंके हे गेले असता त्याठिकाणी ओली पार्टी सुरू असल्याची बाब समोर आली.

हा सर्व प्रकार 28 फेब्रुवारी रोजी घडला असून त्याची व्हिडिओ क्लिप पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना आणि आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आली होती. मात्र पंधरा दिवस उलटल्यानंतर देखील या कर्मचार्‍यांवर कोणतीही कारवाई न झाल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. एवढा गंभीर प्रकार घडलेला असताना देखील कर्मचाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम अधिकारी का करीत आहे,हा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :ambernathअंबरनाथ