शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

ए.के. जोशीच्या प्रकल्पांची चीनमध्ये बाजी , कांस्यपदकाने सन्मानित : ज्वेलरी शॉपमधील चोेरी, अ‍ॅटोमॅटिक पार्किंगचे सादरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 02:32 IST

चीनमधील कास्टिक्स कॉन्टेस्ट या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ठाण्याच्या ए. के. जोशी स्कूलच्या दोन प्रकल्पांना कांस्यपदक मिळाले आहे. सिक्युरिटी सिस्टीम फॉर ज्वेलरी शॉप आणि अ‍ॅटोमॅटिक कार पार्किंग

ठाणे : चीनमधील कास्टिक्स कॉन्टेस्ट या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ठाण्याच्या ए. के. जोशी स्कूलच्या दोन प्रकल्पांना कांस्यपदक मिळाले आहे. सिक्युरिटी सिस्टीम फॉर ज्वेलरी शॉप आणि अ‍ॅटोमॅटिक कार पार्किंग हे दोन्ही प्रकल्प सर्वसामान्य माणसांच्या जीवनाशी निगडित असल्याने ते पाहण्यासाठी विज्ञानप्रेमी आणि विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.दरवर्षीप्रमाणे चीन येथे चायना अ‍ॅडोलन्स्ट सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी इन्व्हेशन कॉन्टेस्ट पार पडली. यंदा यात जगभरातील सुमारे २१ देशांतील मिळून ४० प्रकल्प सादर करण्यात आले. या स्पर्धेत ठाण्यातील आनंदीबाई जोशी अर्थात ए.के. जोशी स्कूलचे विद्यार्थी दोन प्रकल्पांसह दहाव्या वर्षी सहभागी होते. ते दोन्ही कांस्यपदकाचे मानकरी ठरले. जर्मनीच्या प्रकल्पाला सुवर्ण, तर स्वीडनच्या प्रकल्पाला रौप्यपदक मिळाले. त्यांचे प्रकल्प हे बायोलॉजी, मॅथेमॅटिक्सशी संबंधित होते.जोशी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे ‘लो कॉस्ट सिक्युरिटी सिस्टीम फॉर ज्वेलरी शॉप’ आणि ‘अ‍ॅटोमॅटिक कार पार्किं ग’ हे दोन्ही प्रकल्प थेट प्रात्यक्षिकाद्वारे आणि मनोरंजनात्मक पद्धतीने सादर केले असल्याने उपस्थित प्रत्येकाने ते आवर्जून पाहिले. आठवीतील मिहिर गोरे आणि रुचिर चित्रे या विद्यार्थ्यांनी ‘लो कॉस्ट सिक्युरिटी सिस्टीम फॉर ज्वेलरी शॉप’ हा ज्वेलरी शॉपमधील चोरीवर नजर ठेवणारा आगळावेगळा प्रकल्प तयार केला होता.ज्वेलरी शॉपमध्ये जर रात्रीच्या वेळी चोरी झाली, तर तिथे असणाºया मोबाइलमधील इन्फ्रा रेड ज्वेलरी शॉपच्या मालकाच्या मोबाइलशी कनेक्ट होईल आणि त्याच्या मोबाइलमध्ये अलार्म वाजेल. एका चीपच्या माध्यमातून ज्वेलरी शॉपमध्ये होणाºया चोरीवर देखरेख ठेवता येणे शक्य आहे. पार्किं गची वाढती समस्या लक्षात घेऊन दहावीतील यश कोकाणे आणि धुव्र देवरे यांनी ‘अ‍ॅटोमॅटिक कार पार्किं ग’ या विषयावरील प्रकल्प तयार केला होता. या प्रकल्पात गाडीला चारही बाजूने सेन्सर लावलेले असतात. कोणत्याही ठिकाणी गेल्यावर गाडी पार्किं गसाठी स्वत:च जागा शोधते. जागेनुसार मागेपुढे होते. या विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका शिल्पा भांगले, पूर्णिमा साठे, मीना निफाडकर, पल्लवी पटवर्धन यांचे मार्गदर्शन लाभले, तर विशेष मार्गदर्शन करणारे डॉ. विजय बेडेकर आणि डॉ. सुधाकर आगरकर हे त्यांच्यासोबत चीन येथे गेले होते.