शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रेतीबंदरनजीकच्या ट्रॅकवर हवा ओव्हर ब्रीज!

By admin | Updated: August 28, 2015 00:12 IST

शहराचा द एन्ड समजल्या जाणाऱ्या रेतीबंदर रोडनजीक गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वस्ती वाढलेली आहे. त्या पाठोपाठ तेथून शहरभर व बाहेर जाणा-या वाहनांचीही संख्या वाढली आहे.

- अनिकेत घमंडी,  डोंबिवलीशहराचा द एन्ड समजल्या जाणाऱ्या रेतीबंदर रोडनजीक गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वस्ती वाढलेली आहे. त्या पाठोपाठ तेथून शहरभर व बाहेर जाणा-या वाहनांचीही संख्या वाढली आहे. असे असूनही या ठिकाणच्या दिवा-वसई मार्गावरील रेल्वेचे फाटक ही वाहनचालकांसाठी मोठी समस्या ठरले आहे. या ठिकाणाहून धावणा-या मालगाड्यांसह अन्य लांबपल्याच्या गाड्या व मेमू ट्रेन आदींची वाहतूक सुरु असते. परिणामी अनेकदा गेट बंद झाल्याने वाहनांची कोंडी होते. त्यासाठी या ठिकाणी रेल्वे उड्डाणपूलाची (रोड ओव्हर ब्रीज) ची नितांत गरज आहे.काही दक्ष नागरिकांनी अंडरपासचाही पर्याय सुचवला, परंतू नजीकच खाडी असल्याने तो पर्याय तितकासा योग्य नाही. मोठागांव-ठाकुर्लीचे रहिवासी या समस्येने त्रस्त आहेत. पूर्वी या ठिकाणी पाण्याची समस्या होती, त्यासाठी रेल्वे लाइननजीकच विहिर असून तेथून पाणी भरण्यात येत असे. आता तेथे स्वतंत्र पाण्याची टाकी बांधण्यात आल्याने ती समस्या बहुतांशी प्रमाणात संपुष्टात आली. याच ठिकाणी खाडीलगतच स्मशानभूमी असून सध्या तिचे पॅगोडा पद्धतीने नूतनीकरण होत आहे. रस्ते तुलनेने चांगले असले तरीही रेल्वे फाटकाच्या ठिकाणी गेट बंद झाल्यावरही छोट्या जागेतून दुचाकी कसाबसा मार्ग काढते, पण ते जीवघेणे ठरू शकते, मात्र त्याकडे नगरसेवकांचे लक्ष नाही. याच ठिकाणाहून शहरातील विशेषत: पश्चिमेकडील बहुतांशी घरगुती व सार्वजनिक मोठी मंडळांचे व पूर्वेकडील निवडक मंडळांचे गणपती विसर्जन याच ठिकाणी होते. त्या मंडळांनाही या फाटकामुळे अडथळा होतो. परिणामी रात्री-मध्यरात्री उशिरापर्यंत विसर्जन सुरु असते. ही स्थिती बदलण्यासाठीही तेथे रेल्वे ओव्हर ब्रीज होणे गरजेचे आहे. बहुतांशी शाळकरी मुले, त्यांचे पालक गेट बंद असतांनाही केवळ वेळ पाळण्यासाठी रुळ ओलांडून मार्गस्थ होतात. कचरा उचलण्यासाठी मोठी गाडी येथे येऊ शकत नाही, त्यामुळे या ठिकाणच्या रहिवाशांना चाळीच्या ठिकाणी व्यक्तीश: डस्टबिन देण्यात आले आहे. आता बहुतांशी प्रमाणात घंटागाडी येत असते. त्यामुळे काही ठिकाणचा अपवाद वगळता कच-याची समस्या कायम आहे. खाडी किना-यालगतच गणेश घाट आहे, त्याचेही काम सुरु असून सुशोभिकरण करण्यात येत आहे. तेथून नजीकच्या गावांमध्ये जाण्यासाठी खासगी बोटी चालविण्यात येतात, साधारणत: माणशी १० रुपये आकारुन ही सुविधा देण्यात येते. परंतू प्रवाशांच्या सुरक्षेची मात्र कोणतीही हमी देण्यात येत नाही. ही सुविधा सुरक्षित करून मगच ती महापालिकेतर्फे उपलब्ध करून द्यावी, अशी जनतेची मागणी आहे.