शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

एक लाख राेजगारासाठी कंपन्यांसाेबत करार- मंत्री मंगलप्रभात लोढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2023 11:06 IST

रोजगार मेळाव्यात ठाणे, मुंबई, पुणे या जिल्ह्यातील ६० कंपन्या सहभागी झाल्या होत्या.

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : जिल्ह्यातील उद्योजकांना एकत्र करून एक लाख रोजगारांचे एमओयू करून  नाेकऱ्या मिळवून देण्यात येतील, असे आश्वासन कौशल्य विकास व नावीन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. यावेळी त्यांनी शहरात फिरते कौशल्य केंद्र सुरू करण्याची घाेषणा केली. त्यामार्फत ५०० हून जास्त अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार शिकवले जातील, तसेच चाळी, झोपडपट्टीतही हे फिरते केंद्र जाईल, असेही ते म्हणाले.

कोपरी-पाचपाखाडी येथे ‘शासन आपल्या दारी’मध्ये जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र ठाणे, बारटक्के फाउंडेशन व जगदाळे फाउंडेशन आयोजित पं. दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा रविवारी आर. जे. ठाकूर कॉलेज येथे पार पडला.

यावेळी माजी नगरसेवक हणमंत जगदाळे, दिलीप बारटक्के, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे दिगंबर दळवी,  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त संध्या साळुंखे, सी. डी. देशमुख प्रशिक्षण संस्थेचे संचालक महादेव जगताप,  मंगेश ठाकूर, वनिता गोगरे, दिगंबर ठाकूर  आदी उपस्थित होते. 

६० कंपन्या सहभागी

रोजगार मेळाव्यात १८ ते ४५ वयोगटातील  तीन हजार १०० उमेदवारांनी नोंदणी केली हाेती. ठाणे, मुंबई, पुणे या जिल्ह्यातील ६० कंपन्या यात सहभागी झाल्या होत्या. एक हजार २२१ महिला उमेदवारांंचा समावेश आहे. यातील ७४३ जणांची प्राथमिक निवड झाली असून, ३५ जणांची अंतिम निवड झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Mangalprabhat Lodhaमंगलप्रभात लोढा