ठाणे : सतत तक्रारी, पत्रव्यवहार करून न्याय मिळत नसल्याने वेगवेगळ्या संस्था, व्यक्ती स्वातंत्र्यदिनी आठ ठिकाणी प्रशासनांच्या विरोधात उपोषण, धरणे, आंदोलने आणि स्मशानभूमीत जाऊन मुंडण करणार आहेत. महापालिका, जिल्हा प्रशासन, पोलीस, बांधकाम विभाग यांविरोधात हे आंदोलन होणार आहे.सुनील शिंदे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काळी फीत लावून बेमुदत उपोषण करणार आहे. लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन, वितरण प्रसारणाच्या मागणीसाठी हे उपोषण आहे. कल्याणच्या वाघेरेपाडा येथील आदिवासींची जमीन हडप करणाºयांवर अॅट्रॉसिटी दाखल करण्याच्या मागणीसाठी विशाल कुमार गुप्ता आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू करणार आहेत. कल्याण तालुक्यातील रुंदे गावातील शेतकºयास चार वर्षे न्याय न दिल्याने जिल्हााधिकारी, उपविभागीय अधिकारी व कल्याणचे तहसीलदार यांच्या निषेधार्थ सुदाम धर्मा पाटील यांनी रुंदे गावाच्या स्मशानभूमीत अधिकाºयांचे श्राद्ध घालून मुंडण करण्याचा इशारा दिला आहे.रुंदीकरणाच्या नावाखाली ठाणे शहर विकास आराखडा गुंडाळून एफएसआय वाटपात गैरप्रकार केल्याप्रकरणी शौकत मुलाणी आझाद मैदानावर बेमुदत उपोषण करणार आहेत. नशामुक्त कंपनी व कॉन्ट्रॅक्टरकडून आर्थिक फसवणुकीविरोधात कल्याणच्या ठाकुर्ली येथील गालेगाव येथील अरविंदकुमार झा आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहे. सूडबुद्धीने कारवाई करून निलंबित केल्याच्या आरोपाखाली ठामपाचे कर्मचारी दिनेश गावडे टीएमसीसमोर उपोषण करणार आहेत. अंजूरफाटा ते चिंचोटी, भिवंडी-वसई रोडवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना त्रास होत आहे. त्याकडे दुर्लक्ष करण्याविरोधात भिवंडी तालुक्यातील पाये येथील विनोद वैती यांनी रस्त्यावर साखळी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. मुरबाडच्या कोळीवाडा उगळेआळीतील राजाभाऊ सरनोबत राज्य उत्पादन शुल्क कार्यालयासमोर उपोषण करतील.>गैरप्रकाराविरोधात आंदोलनठाण्यातील रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली शहर विकास आराखडा गुंडाळून एफएसआय वाटपात गैरप्रकार केल्याच्या आरोपाखाली येथील महागिरी कोळीवाड्यात राहणारे शौकत शेखलाल मुलाणी आझाद मैदानावर बेमुदत उपोषण करणार आहेत.
आठ ठिकाणी आज उपेक्षितांची आंदोलने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 03:23 IST