ठाणे : मोदी सरकारचे ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेन दिव्याजवळील म्हातार्डे-आगासन येथून वळून पुढे जाणार आहे. या मार्गासाठी, तेथील शेतकऱ्यांना कोणत्याही नोटिसा न देता तेथील जागेचे सर्वेक्षण सुरू झाले होते. मात्र, दोन वेळा सर्वेक्षणासाठी आलेल्या अधिकाºयांना शेतकºयांनी विरोध दर्शवला. दरम्यान, शेतकºयांच्या जमिनीस काय मोबदला मिळणार, ते जाहीर करावे, अशी मागणी आता आगासन गाव बचाव संघर्ष समितीने लावून धरली आहे.दिव्यातून जाणाºया बुलेट ट्रेनसाठी जमीन अधिग्रहणास सुरुवात झाल्यावर येथील शेतकºयांना येथून बुलेट ट्रेन जाणार असल्याचे समजले. त्यानंतर, येथील शेतकºयांनी आगासन गाव बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून एकत्र येऊन सर्वेक्षणाला विरोध दर्शवला. तसेच ठाणे जिल्हाधिकाºयांची भेट घेऊन चर्चा करण्यासाठी बैठक बोलवण्याची मागणी केली. त्यानुसार, पहिली बैठक झालीही. पण, त्यामध्ये कोणताही निष्कर्ष न निघाल्याने पुन्हा एप्रिल महिन्यात बैठक होणार आहे. याचदरम्यान, समितीने या बैठकीत ज्यांच्या जमिनी जाणार आहेत, त्या शेतकºयांसह स्थानिक लोकप्रतिनिधींना बोलण्याचा आग्रह धरला आहे. तसेच विकासाला विरोध नाही, पण विश्वासात घेत नाही म्हणून त्याला विरोध केला आहे. तसेच मोबदला काय मिळणार, ते जाहीर करावे, अशी मागणी केल्याचे समिती अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी सांगितले.
बुलेट ट्रेनविरोधात आगासनवासी संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 03:01 IST