शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

बुलेट ट्रेनविरोधात आगासनवासी संतप्त, शेतक-यांनी दर्शवला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 01:56 IST

मोदी सरकारचे ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेन दिव्याजवळील म्हातार्डे-आगासन येथून वळून पुढे जाणार आहे. या मार्गासाठी, तेथील शेतकऱ्यांना कोणत्याही नोटिसा न देता तेथील जागेचे सर्वेक्षण सुरू झाले होते.

ठाणे : मोदी सरकारचे ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेन दिव्याजवळील म्हातार्डे-आगासन येथून वळून पुढे जाणार आहे. या मार्गासाठी, तेथील शेतकऱ्यांना कोणत्याही नोटिसा न देता तेथील जागेचे सर्वेक्षण सुरू झाले होते. मात्र, दोन वेळा सर्वेक्षणासाठी आलेल्या अधिका-यांना शेतक-यांनी विरोध दर्शवला. दरम्यान, शेतकºयांच्या जमिनीस काय मोबदला मिळणार, ते जाहीर करावे, अशी मागणी आता आगासन गाव बचाव संघर्ष समितीने लावून धरली आहे.दिव्यातून जाणाºया बुलेट ट्रेनसाठी जमीन अधिग्रहणास सुरुवात झाल्यावर येथील शेतकºयांना येथून बुलेट ट्रेन जाणार असल्याचे समजले. त्यानंतर, येथील शेतकºयांनी आगासन गाव बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून एकत्र येऊन सर्वेक्षणाला विरोध दर्शवला. तसेच ठाणे जिल्हाधिकाºयांची भेट घेऊन चर्चा करण्यासाठी बैठक बोलवण्याची मागणी केली. त्यानुसार, पहिली बैठक झालीही. पण, त्यामध्ये कोणताही निष्कर्ष न निघाल्याने पुन्हा एप्रिल महिन्यात बैठक होणार आहे. याचदरम्यान, समितीने या बैठकीत ज्यांच्या जमिनी जाणार आहेत, त्या शेतकºयांसह स्थानिक लोकप्रतिनिधींना बोलण्याचा आग्रह धरला आहे. तसेच विकासाला विरोध नाही, पण विश्वासात घेत नाही म्हणून त्याला विरोध केला आहे. तसेच मोबदला काय मिळणार, ते जाहीर करावे, अशी मागणी केल्याचे समिती अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी सांगितले.ही गाडी मुंबईत बीकेसी येथून सुटेल. पुढे ती ठाण्याहून दिव्याजवळ म्हातार्डे-आगासन येथे येईल. तेथून ती वळून विरार, बोईसरला जाईल आणि पुढे गुजरातला रवाना होईल. तेथे वापी, बिलिमोरा, भडोच, बडोदा, आणंद येथे थांबून अहमदाबादला पोचेल. मात्र म्हातार्डे-आगासन येथील थांबा नकाशात दाखवलेला नाही.

टॅग्स :thaneठाणे