शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मारहाणीने आठवले समर्थकांमध्ये संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 23:54 IST

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना प्रविण गोसावी या तरुणाने मारहाण केल्याने रिपाइं कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी निषेध व्यक्त करुन आरोपीविरूद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

अंबरनाथ : येथील कार्यक्रमात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना प्रविण गोसावी या तरुणाने मारहाण केल्याने रिपाइं कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी निषेध व्यक्त करुन आरोपीविरूद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली.अंबरनाथमध्ये रिपाईच्या वतीने आयोजित केलेल्या संविधान दिनाच्या कार्यक्रमामध्ये व्यासपिठावरुन उतरल्यानंतर रामदास आठवले यांना रिपाइंचा बंडखोर कार्यकर्ता प्रविण गोसावी याने मारहाण केल्याची घटना घडली. कार्यकर्त्यांनी त्याला जबर मारहाण केल्यानंतर पोलिसांनी त्याला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; मात्र प्रकृती खराब असल्याने त्याला मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले.पोलीस बंदोबस्तातील त्रुटींवर बोट ठेऊन रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे यांना केली. आठवले केंद्रीय मंत्री असतानाही त्यांना योग्य सुरक्षा पुरवली नाही, असा आरोप रिपाइंचे शहराध्यक्ष अजय जाधव यांनी केला. संतप्त कार्यकर्त्यांनी अंबरनाथ बंदची हाक देऊन स्टेशन परिसरात व्यापाºयांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. अनुचित प्रकार घडू नये यासाठी व्यापाºयांनी बंद पाळला. रिक्षा सेवाही बंद राहिल्याने नागरिकांचे हाल झाले. रिपाइंचे विभागीय अध्यक्ष देवीदास भोईर यांच्या रविवारी कसारा येथे बंद पाळण्यात आला. या बंदमध्ये लहान मोठे व्यापारी, भाजी विक्रेते तसेच रिक्षा आणि टॅक्सी चालकांनीही सहभाग घेतला. रस्त्यावर एसटी महामंडळाच्या बसेसही तुरळक प्रमाणात होत्या. कसारा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी कुंदन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी चोख पोलीस बंदोबस्त होता. बंददरम्यान कसारा येथील पक्ष कार्यालयानजीक निषेध सभा घेऊन आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. या सभेस सुहास जगताप, किशोर जाधव, राजू उबाळे, संतोष कर्डक, कुणाल गांगुर्डे आदी पदाधिकाºयांसह शेकडो आठवले समर्थक उपस्थित होते. सायंकाळी चार वाजताच्या सुमारास कार्यकर्त्यांनी कसारा बाजारपेठ मार्गे रॅली काढून कसारा रेल्वे स्थानकावर धडक दिली. तिथे कसाराहून मुंबईला जाणारी लोकल कार्यकर्त्यांनी अडवली. यावेळी देवीदास भोईर, रविंंद्र शेजवळ, प्रशांत मोरे, शांताराम शेजवळ, किरण सोनवणे यांच्यासह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.मुरबाडमध्ये रॅलीमुरबाड : आठवले यांच्यावरील हल्ल्यामुळे आंबेडकरी जनतेत संतापाची लाट उसळली असून, रिपाइंचे ठाणे जिल्हाध्यक्ष बाळाराम गायकवाड यांच्या आदेशानुसार तालुकाध्यक्ष दिनेश उघडे, युवा अध्यक्ष अण्णा साळवे, विशाल चंदने, गुरु नाथ खोलांबे, संजय खोलांबे, संतोष उघडे, भूपेश साटपे, कैलास देसले यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी मुरबाड शहरात निषेध रॅली काढून व्यापाºयांना दुकाने बंद करण्याचे अवाहन केले. हल्ल्यास जबाबदार असणाºया पोलीस अधिकाºयांवर कारवाई आणि हल्लेखोर प्रविण गोसावी याला कठोर शिक्षा करण्याच्या मागणीसाठी मुरबाडचे पोलीस निरिक्षक अजय वसावे यांना निवेदन देण्यात आले.उल्हासनगरमध्ये संमिश्र प्रतिसादउल्हासनगर : रिपाइंने दिलेल्या उल्हासनगर बंदच्या हाकेला समिश्र प्रतिसाद मिळाला. रिपाइंच्या शेकडो कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून निषेधाच्या घोषणा दिल्या. आरोपीला धडा शिकविण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. रिपाइंचे शहराध्यक्ष भगवान भालेराव यांच्यासह इतर पदाधिकाºयांनी दिलेल्या बंदच्या हाकेला व्यापाºयांनी प्रतिसाद देवून दुकाने बंद ठेवली. पुर्वेला बंदचा फारसा प्रतिसाद जाणवला नाही. भगवान भालेराव यांच्यासह जनार्धन ढगे, शोभा जाधव यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी सकाळीच रस्त्यावर उतरून मारहाणीचा निषेध केला.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेagitationआंदोलन