शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

फरिदाला ओमानला पाठविणारा एजंट गेला कोठडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 06:55 IST

परिस्थितीने गांजलेल्या फरिदा नावाच्या महिलेला ओमानमधील एका शेखकडे नोकरीसाठी पाठवून तिच्या हालअपेष्टांसाठी कारणीभूत ठरलेल्या एजंट इम्रानला अंबरनाथ पोलिसांनी अटक केली आहे. त्याला ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अंबरनाथ -    परिस्थितीने गांजलेल्या फरिदा नावाच्या महिलेला ओमानमधील एका शेखकडे नोकरीसाठी पाठवून तिच्या हालअपेष्टांसाठी कारणीभूत ठरलेल्या एजंट इम्रानला अंबरनाथ पोलिसांनी अटक केली आहे. त्याला ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आपल्यावर पोलिसांनी कारवाई करू नये, यासाठी त्याने सुटकेसाठी उकळलेले ४० हजार रूपयेही फरीदाला परत केले होते.या एजंटविरोधात फरिदाने अंबरनाथ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तसेच महिला आयोगानेही त्या संदर्भात कारवाईचे निर्देश दिल्याने इम्रान अटक करण्यात आली.अंबरनाथच्या पश्चिम भागातील बुवापाडा या झोपडपट्टीसदृश्य परिसरात फरिदा अब्दुल अजीज खान (३६) राहते. घरची परिस्थिती बेताचीच असल्याने तिने दुबईला नोकरी करण्याचा निर्णय घेतला. एका एजंटमार्फत ती तेथे रवाना झाली. पण ती जेथे काम करत होती तेथे तिला मरणयातना सहन कराव्या लागल्या. दिवसाचे २० ते २३ तास कष्ट करूनही तिला सुकी रोटी खावी लागत होती. महिनाभर फरिदाने हे हाल सोसले आणि संधी मिळताच भारतात नवऱ्याशी संपर्क साधला आणि तेथील परिस्थिती सांगितली. आपल्या पत्नीसमोरील संकट दूर करून तिला पुन्हा भारतात आणण्यासाठी त्याने अंबरनाथच्या त्याच एजंटला गळ घातल्यावर त्याने तिच्या सुटकेसाठी ४० हजार रूपये उकळले. त्यानंतरही सुटकेसाठी काहीच हालचाल होत नसल्याने त्याने परराष्ट्र मंत्रालय आणि महिला आयोगाची मदत घेतली. त्यांच्या प्रयत्नांनंतर फरिदाची कशीबशी सुटका झाली. तरीदेखील फरिदाला दुबईच्या एजंटकडे दोन महिने रहावे लागले. त्यामुळे तीन महिने संकटाशी झुंज देत ती अखेर १ मे रोजी भारतात परतली.तिची फसवणूक करणारा अंबरनाथ येथील एजंट इम्रान याला यापूर्वी पेपरफुटी प्रकरणात अटक करण्यात आली होती. पण भारतात परतल्यावर फरिदाने केलेली तक्रार, तिच्या हालअपेष्टांचे वर्णन आणि महिला आयोगाने दिलेल्या निर्देशामुळे अंबरनाथ पोलीस ठाण्यात इम्रानविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. त्याला ३१ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.दुबईतील शेखच्या तावडीतून फरीदाची सुटका करायची असेल आणि तिला पुन्हा भारतात परत आणायचे असेल तर ४० रूपये द्यावे लागतील असे इम्रानने तिच्या नवºयाला सांगितले होते. त्याने जमवाजमव करून पैसे दिले, तरीही तिची सुटका झाली नव्हती.

टॅग्स :jailतुरुंगnewsबातम्या