शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पारंपरिक पद्धतीनेच ठरवले जाते वृक्षाचे वय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 01:11 IST

आधुनिक पद्धतीचा अभाव । ठाण्यात पाच लाख वृक्ष असल्याचा पालिकेचा दावा

अजित मांडकेठाणे : ठाण्यात शेकडो वर्षे जुने शेकडो वृक्ष असूनही त्यांचे आयुर्मान निश्चित करण्याकरिता पारंपरिक पद्धतीचाच वापर केला जात आहे. कार्बन डेटिंग किंवा रेडिओ अ‍ॅक्सिव्ह कार्बन या पद्धतीने वृक्षाचे नेमके वय निश्चित करण्याची पद्धती अवलंबली जात नाही. एखाद्या झाडाचे आयुर्मान ठरवताना ठाणेकर वृक्षप्रेमी व तज्ज्ञ पारंपरिक पद्धतीचा वापर करतात. यामध्ये या वृक्षाचा आकार त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मानला जातो. तसेच त्याच्या फांद्या या किती जाड आहेत, त्या जमिनीत किती खोलवर गेल्या आहेत आणि त्या फांद्यांची संख्या किती आहे, यावरून झाडाचे आयुर्मान ठरवले जाते.

कार्बन डेटिंग पद्धतीने मोजता येते वयवैज्ञानिक दृष्टीने एखाद्या वृक्षाचे आयुर्मान ठरवायचे झाल्यास त्यामध्ये दोन पद्धतीचा अवलंब होऊ शकतो. एका पद्धतीमध्ये वृक्ष हा मृत असावा लागतो. त्यानुसार, त्या वृक्षाच्या खोडाचा आडवा छेद पातळ कापावा लागतो. त्यानंतर, त्या वृक्षाची यावरून वाडचक्र मोजली जातात आणि यावरूनच एखाद्या वृक्षाचे वय समजले जाऊ शकते, अशी माहिती वृक्षतज्ज्ञ डॉ. नागेश टेकाळे यांनी दिली. दुसऱ्या पद्धतीमध्ये खोडाच्या मध्यभागातील पेशींचा समूह बाहेर काढावा लागतो. त्यानंतर रेडिओ अ‍ॅक्सिव्ह कार्बनच्या साहाय्याने त्या झाडाचे आयुर्मान निश्चित केले जाऊ शकते. परंतु, ही अत्याधुनिक पद्धत आपल्याकडे वापरली जात नाही. देशातील डेहराडून आणि इतर ठिकाणी याच पद्धतीने जुन्या वृक्षाचे आयुर्मान मोजले जाते.

ठाणे शहरात पाच लाखांहून अधिक वृक्षठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने केलेल्या सर्वेक्षणात शहरात आजमितीला पाच लाखांहून अधिक वृक्ष आहेत. सर्वेक्षण करताना वृक्ष किती जुना, याचा अंदाज बांधला जातो व त्याची गणना केली जाते.

येथे आहेत १०० वर्षांपूर्वीचे वृक्षशहरातील क्लेरिअंट कंपनी, बाराबंगला, गडकरी रंगायतन, रेमण्ड कंपनी, ग्लॅक्सो, कापूरबावडी पोलीस स्टेशन आदींसह इतर खाजगी जागांमध्ये अशा प्रकारचे शंभरहून अधिक १०० किंवा त्यापेक्षा अधिक आयुर्मान असलेले वृक्ष आहेत. ठाणेकरांचे हे ऐतिहासिक संचित जतन करण्यासाठी पालिका स्तरावर प्रयत्न सुरू आहेत.

टॅग्स :thaneठाणे