शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आगरी शालेन चल बाला... दप्तर, पुस्तक झेऊन चल..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 02:04 IST

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आगरी शाळा ठाण्यात सुरू झाली आहे. यात पहिल्या दिवशी आलेल्या भाषाप्रेमींनी आगरी भाषेचे धडे गिरवले.

ठाणे : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आगरी शाळा ठाण्यात सुरू झाली आहे. यात पहिल्या दिवशी आलेल्या भाषाप्रेमींनी आगरी भाषेचे धडे गिरवले. यात आगरी भाषेतील बाराखडीपासून प्रत्येक शब्दांचा उच्चार कसा करावा, याचे प्रशिक्षण प्रशिक्षणार्थ्यांनी घेतले. केवळ ठाणे नव्हेच तर पुणे, अलिबाग, मुंबई, बाळकुम, भिवंडी अशा विविध भागांतील आगरी अन् बिगरआगरी प्रशिक्षणार्थ्यांचाही सहभाग होता.आगरी भाषेची विविध अंगे कळावी, त्यातील साहित्याची गोडी कळावी, या अनुषंगाने युवा साहित्यिक सर्वेश तरे यांनी ‘आगरी शाला’ हा बोलीभाषा संवर्धनार्थ नवीन प्रयोग सुरू केला. या आगरी शाळेच्या पहिल्या वर्गात १५ प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यात आगरी अन् बिगरआगरी प्रशिक्षणार्थ्यांचाही सहभाग होता. या आगरी शाळेच्या पहिल्या वर्गात गजानन पाटील, प्रकाश पाटील, मोरेश्वर पाटील आणि सर्वेश यांनी मार्गदर्शन केले. प्रकाश पाटील यांनी आगरी भाषेतील लुप्त होत चाललेल्या काही शब्दांची आठवण करून दिली. मोरेश्वर पाटील यांनी ही भाषा फक्त समाजापुरती मर्यादित नसून तिची व्याप्ती विशाल आणि सर्वसमावेशक आहे, हे समजावून दिले. गजानन पाटील यांनी आगरी बोलीचा व्यवहारात कसा वापर करता येऊ शकतो, हे समजावून सांगितले. सर्वेश यांनी आगरी बोली जर एका दिवसात शिकायची झाल्यास सोपे नियम सांगून ‘ळ’ या अक्षराऐवजी ‘ल’, ‘ण’ या अक्षराऐवजी ‘न’, ‘ड’ या अक्षराऐवजी ‘र’ असे शब्दप्रयोग करण्याचा प्रयत्न केला की, आगरी भाषा तुम्हाला सहज बोलता येऊ शकेल, असे सांगितले. या शाळेचे पुढील वर्ग शनिवार-रविवारी भरणार असून एकाच दिवशी दोन सत्रांचे आयोजन करण्याचे ठरवले आहे. पुढील ‘आगरी शाळेचे वर्ग’ ५-६ मे, १२-१३ मे तसेच १९-२० मे रोजी कशेळी येथील शाळेत ४ ते ६ या वेळेत भरणार आहे. या वर्गांसाठी प्रा. सदानंद पाटील, प्रा. एल.बी. पाटील, डॉ. अनिल रत्नाकर, दया नाईक, प्रकाश पाटील, मोरेश्वर पाटील, गजानन पाटील यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.