शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

खासगी बसेसच्या विरोधात कोपरीकरांचा पुन्हा एल्गार, मंगळवारी रोखणार वाहतूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 15:35 IST

ठाणे पूर्वेतून सुटणाऱ्या खासगी बसेसच्या विरोधात कोपरीतील रहिवासी पुन्हा एकदा एकटवले आहेत. सहा महिन्यांनंतरही ही वाहतूक बंद न झाल्याने आता कोपरी संघर्ष समितीच्या वतीने प्रशासनाला जाग आणण्यासाठी मंगळवारी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.

ठाणे - ठाणे पूर्वेतून सुटणाऱ्या खासगी बसेसच्या विरोधात कोपरीतील रहिवासी पुन्हा एकदा एकटवले आहेत. सहा महिन्यांनंतरही ही वाहतूक बंद न झाल्याने आता कोपरी संघर्ष समितीच्या वतीने प्रशासनाला जाग आणण्यासाठी मंगळवारी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. यावेळी या बसेसही रोखण्याचा इशारा समितीने दिली आहे.मागील सहा महिन्यांपूर्वी देखील समितीच्या वतीने कोपरी येथून होणा-या खासगी बसेसच्या विरोधात आंदोलन उभारण्यात आले होते. त्यानंतर या बसेस काही दिवसांसाठी का होईना बंद झाल्या होत्या. त्यानंतर वाहतूक पोलीस आणि संबंधित आरटीओ प्रशासनाने देखील यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आज सहा महिने उलटून गेल्यानंतरही याच्या विरोधात कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. उलट आता तर या बसेसवाल्यांची मुजोरी आणखीनच वाढली आहे. सरकार दरबारी या गंभीर समस्येची दाद मागत असताना ब-याच बैठका संघर्ष समिती व प्रशासकीय अधिका-यांसोबत झाल्या. परंतु आश्वासनांच्या पलीकडे दुसरे काहीच मिळाले नसल्याचे समितीने सांगितले आहे.त्यामुळेच आता पुन्हा संबंधित प्रशासनाला जाग येण्यासाठी एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणाचे हत्यार उपसण्यात येणार असल्याची माहिती समितीने दिली. या उपोषणाच्या माध्यमातून काही मागण्या देखील केल्या जाणार असून यामध्ये अवैध बस व जीप, मोटर वाहतूक फक्त कोपरीतूनच नव्हे तर संपूर्ण ठाण्यातूनच बंद व्हावी, परवानाधारक कंपनी बसेसच्या आड जी अवैध वाहतूक चालते त्याला ही चाप बसावा, कोपरी वाहतूक पोलीस शाखेची चौकी अथवा संपूर्ण कोपरी वाहतूक पोलीस ऑफिस हे गावदेवी बस थांबा, साईबाबा मंदिराजवळ शिफ्ट करावे, परवानाधारक कंपनी बसेस ने त्यांच्या कंपनीचे नाव, त्याच बरोबर प्रवास करणा-या कंपनी कामगारांनी कंपनीचे ओळखपत्र दिसेल अशा स्वरूपात बस मधून चढताना, उतरताना बाळगावे, परवानाधारक कंपनीच्या बसेसचे बस क्रमांक, कंपनीचे नाव, पीकअप आणि ड्रॉपची वेळ ही एका मोठ्या बोर्डवर गावदेवी बस थांब्या जवळ लावावी,प्रादेशिक परिवहन विभाग व ठाणे वाहतूक पोलीस शाखेने सातत्याने आलटून पालटून या खासगी कंपनी बसेसच्या कागदपत्रांची तपासणी करावी, जेणेकरून सर्व बस चालकांना कायद्याच्या धाकाने शिस्त लागेल, या मागण्यांसदर्भात चालढकल करण्यात आली तर यापुढील कोपरी संघर्ष समितीचे आंदोलन हे अतिशय उग्र स्वरूपाचे असेल ज्याची दखल मुख्यमंत्र्यांना घ्यावी लागेल असा इशाराही समितीच्या वतीने विनोद मोरे, नितीन पाटील, रवींद्र मोरे, राजेश गाडे आदी समिती सदस्यांनी दिला आहे.