शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या विरोधात 'सेवा नाही तर कर नाही’ लाक्षणिक मूक धरणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2017 16:15 IST

कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे कर भरणा-या नागरिकांना सेवा पुरविल्या जात नसल्याच्या निषेधार्थ ‘सेवा नाही तर कर नाही’ असा निर्धार व्यक्त करणारे जागरुक नागरिकांचे आंदोलन आज महापालिका मुख्यालयासमोरील शंकरराव चौकात करण्यात आले.

कल्याण- कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे कर भरणा-या नागरिकांना सेवा पुरविल्या जात नसल्याच्या निषेधार्थ ‘सेवा नाही तर कर नाही’ असा निर्धार व्यक्त करणारे जागरुक नागरिकांचे आंदोलन आज महापालिका मुख्यालयासमोरील शंकरराव चौकात करण्यात आले. एक तास मूक धरणे आंदोलन करून प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा निषेध व्यक्त करण्यात आला.

सोशल मीडियाच्या माध्यमातून कल्याण-डोंबिवलीतील नागरिक महापालिकेच्या सेवा न पुरविण्याच्या वृत्तीच्या विरोधात एकवटले आहे. त्यासाठी नागरिकांनी बैठका घेतल्या. तसेच महापालिका मुख्यालयात आयुक्तांनी भेट नाकारल्याप्रकरणी ठिय्या आंदोलन केले. मात्र सेवा नाही तर कर नाही ही आंदोलनाची टॅगलाइन ठरविण्यात आली आहे. माहिती अधिकाराचे कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी या आंदोलनासाठी पुढाकार घेत 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीचे औचित्य साधून महापालिकेच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा महापालिका प्रशासनास दिला होता. त्यानुसार आज सकाळी शंकरराव चौकात एक तासाचे मूक धरणे देण्यात आले. या मूक धरणे आंदोलनात घाणेकर यांच्यासह माजी नगरसेवक इफ्तेखार खान, उमेश बोरगावकर, उमंग सामाजिक संस्थेचे गफ्फार शेख, काँग्रेस महिला आघाडीच्या कांचन कुलकर्णी, जागरुक नागरिक शैलेंद्र नेहरे, शैलेश जोशी, मदन शंकलेषा, संदीप देसाई आदी सहभागी झाले होते. घाणेकर यांनी सांगितले की, सेवा नाही तर कर नाही या आंदोलनास आजपासून सुरुवात झालेली आहे. हे आंदोलन ठिकठिकाणी करण्यात येणार आहे. आज सायंकाळी कल्याण पूर्व भागातील ड प्रभाग कार्यालयापासून लोकग्रामपर्यंत मेणबत्ती घेऊन कॅण्डल मार्च काढण्यात येणार आहे. कर भरणा-या नागरिकांना महापालिकेकडून सेवा पुरविल्या जात नसल्याने आयुक्तांना भेटीची वेळ मागितली होती. आयुक्तांनी भेटीची वेळ दिली नाही. तेव्हा ठिय्या आंदोलन केले. त्यावर आयुक्तांनी 29 सप्टेंबर रोजी भेटीची वेळ दिली होती. पुन्हा त्यांना काही काम आल्याने त्यांना 29 सप्टेंबरच्या तारखेला भेटता आले नाही. नव्याने 5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडे पाच वाजता आयुक्त आंदोलनाविषयी चर्चेसाठी भेटणार आहेत. आज गांधी जयंती दिनाची सुट्टी असल्याने निवेदन देण्याचा विषय आज नव्हताच असे घाणोकर यांनी स्पष्ट केले.