शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

ठाण्यातील नितिन कंपनीजवळील पुलाखालील उद्यानाचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता माजिवड्यालाही असाच प्रयोग पालिका करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 16:45 IST

नितिन कंपनी येथील उड्डाणुपलाच्या एक किमीच्या खालील बाजूस उद्यान विकसित केल्यानंतर ठाणे महापालिकेने आता माजिवडा उड्डाणपुलाखाली देखील अशा पध्दतीने उद्यान विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देकॅडबरीला होणार उड्डाणपुलाखाली उद्यानठाणेकरांसाठी ही उद्याने ठरत आहेत, विरंगुळ्याची केंद्र

ठाणे - एमएमआरडीएच्या अख्यत्यारीत असलेल्या नितिन कंपनी येथील उड्डाणपुलाच्या खाली उभारण्यात आलेल्या गार्डनला यश मिळाल्यानंतर पालिकेने मानपाडा पुलाखाली देखील असेच गार्डन सुरु केले आहे. त्यानंतर आता माजिवडा उड्डाणपुलाखालील जागेत देखील अशा पध्दतीने गार्डन तयार करण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. त्यामुळे सकाळ, संध्याकाळच्या सुमारास ठाणेकरांना विरंगुळ्यासाठी ठिकाणे उपलब्ध झाली आहेत.मुंबई-नाशिक आणि मुंबई-अहमदाबाद असे दोन प्रमुख महामार्ग ठाणे तथा घोडबंदर भागातून जातात. या दोन्ही महामार्गांवरील चौकांमध्ये उड्डाण पुलांची उभारणी करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून उड्डाण पुलाखाली मोकळ्या जागेत अस्वस्छा तर काही ठिकाणी, अनाधिकृत गॅरेजवाल्यांनी तर काही ठिकाणी पार्कींग केली जात होती. या पुलाखाली अंधार असल्याने त्याठिकाणी गर्दुल्लेही वाढले होते. या सर्व बाबी लक्षात घेऊन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी उड्डाणपुलाखाली उद्याानांची उभारणी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार त्यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची परवानगी घेऊन त्याठिकाणी उद्याानांची उभारणीचे काम सुरु केले. दोन महिन्यांपुर्वी नितीन कंपनी आणि मानपाडा येथील उद्याानांचे काम पुर्ण करून ते नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी एका खाजगी शाळेच्या ज्युनिअर केजीच्या विद्यार्थ्यांची सहल नितिन कंपनी येथील उद्यानात आली होती. या उद्याानांपाठोपाठ आता कॅडबरी आणि माजिवाडा या उड्डाण पुलाखाली असलेल्या मोकळ्या जागेत उद्यान उभारणीचे काम प्रशासनाने सुरु केले असून येत्या दोन ते तीन महिन्यात ही कामे पुर्ण केली जाणार आहेत. कॅडबरी-बाळकुम उड्डाणपुलाखाली असलेला परिसर केवळ हिरवागार केला जाणार असून त्याभोवती संरक्षक जाळ्या बसविण्यात येणार आहेत. दरम्यान सुशोभित करण्यात आलेल्या या परिसरात आता रंगेबेरंगी विद्यात रोषणाई करण्यात आली आहे. विविध प्रकारची फुल झाडे, नागरिकांना चालण्यासाठी मार्गिका, बच्चे कंपनीसाठी खेळणी, अशी व्यवस्थाही याठिकाणी करण्यात आली आहे. या सुशोभिकरणामुळे येथील रु पडे पालटले असून सायंकाळच्या वेळेस ही ठिकाणे नागरिकांची लक्ष वेधून घेत आहेत. या सर्वच उद्याानांच्या निर्मितीसाठी महापालिकेकडून कोणताही निधी खर्च करण्यात आला नसून शहरातील विकासकांच्या माध्यमातून ही उद्यााने उभारली जात असल्याची माहिती महापालिकेचे माहिती जनसंपर्क अधिकारी महेश राजदरेकर यांनी दिली. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त