शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विस्कळीतपणाच्या ‘शोभायात्रे’नंतर ढोल पथकांना नो-एण्ट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 03:36 IST

यंदा नववर्ष स्वागतयात्रेत काही ढोलपथकांनी यात्रेसोबत चालताना वादन करण्यामध्ये वेळ खर्च केल्याने शोभायात्रेत विस्कळीतपणा आल्याने पुढील वर्षीच्या यात्रेत ढोल-ताशा पथकांना ‘नो एण्ट्री’, अशी भूमिका श्री गणेश मंदिर संस्थानचे अध्यक्ष राहुल दामले यांनी ‘लोकमत’कडे स्पष्ट केली.

अनिकेत घमंडी डोंबिवली : यंदा नववर्ष स्वागतयात्रेत काही ढोलपथकांनी यात्रेसोबत चालताना वादन करण्यामध्ये वेळ खर्च केल्याने शोभायात्रेत विस्कळीतपणा आल्याने पुढील वर्षीच्या यात्रेत ढोल-ताशा पथकांना ‘नो एण्ट्री’, अशी भूमिका श्री गणेश मंदिर संस्थानचे अध्यक्ष राहुल दामले यांनी ‘लोकमत’कडे स्पष्ट केली.पुढील वर्षी लेझीम, झांज आणि ध्वज पथकांना संधी देण्याचा मानस असून तसा प्रस्ताव संस्थानच्या आगामी बैठकीत मांडणार असल्याचे संस्थानचे विश्वस्त प्रवीण दुधे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, शोभायात्रेला १९ वर्षे झाली. आधी पुणे-मावळ आदी भागातून ढोल पथके बोलावली जायची. त्यानंतर शोभायात्रेमुळेच डोंबिवलीत ढोल पथकांची बांधणी झाली. आता ती पथके स्थिरस्थावर झाली आहेत. ढोलपथक हे ‘स्थिर’ वादन असून लेझीम, झांज, ध्वज पथक हे ‘चल’ वादन आहे. त्यामुळे ती शोभायात्रेसोबत सहजपणे पुढे जातील, वेळ वाचेल, विस्कळीतपणा येणार नाही. तसेच ही संस्कृतीदेखील महाराष्ट्राची शान व परंपराच आहे. त्यामुळे आगामी वर्षाकरिता शाळाशाळांमधून लेझीम, झांज पथकांना यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले जाईल. बहुतांश विश्वस्त, सदस्य, पदाधिकारी ही भूमिका मान्य करतील, असा विश्वास दुधे यांनी व्यक्त केला. ढोलपथकांचा प्रत्यक्ष यात्रेत सहभाग नसला तरी त्यांनी एका ठिकाणी वादन करावे. यासाठी त्या पथकांच्या प्रमुखांसमवेत समन्वय साधला जाणार आहे. ढोल पथकांचा यात्रेत सहभाग नसेल, तर ध्वनिप्रदूषणालाही आळा बसेल, असे ते म्हणाले. लेझीम, झांज पथकांचा आवाज ढोल-ताशांच्या तुलनेत कमी असतो, तसेच त्यात जास्तीतजास्त जणांना सहभागी होता येते.>अर्धा तास वाया गेल्याचे नोंदवले मतयंदाची शोभायात्रा ही भागशाळेपासून वेळेत निघाली, पण पूर्व-पश्चिम उड्डाणपूल येथे शोभायात्रेची शृंखला तुटली. पश्चिमेला द्वारका हॉटेलनजीकच्या चौकात एक पथक वादन करत बसले. त्यामुळे हे घडले.शोभायात्रेचे एक टोक पश्चिमेकडून पूर्वेला रामनगरभागात आले, पण शृंखला तुटल्याने यात्रा विस्कळीत झाली. संस्थानचे दामले आणि दुधे यांची विस्कळीत यात्रे पूर्ववत करताना धावपळ झाली.आयोजक आणि ढोल पथक यांच्यात भरयात्रेदरम्यान चढ्या आवाजात चर्चा झाली, अखेरीस पथकाने शोभायात्रेसोबत चालण्याचा प्रयत्न केला. यामुळे यात्रेचा अर्ध्या तासाहून अधिक वेळ गेला. त्यामुळे आगामी वर्षापासून शोभायात्रेत ढोल पथकांना प्रवेश न देण्याच्या निर्णयावर दामले यांनी शिक्कामोर्तब केले.