शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
3
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
4
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
5
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
6
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
7
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
8
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
9
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
10
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
11
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर माणकोली उड्डाणपूलाची मार्गिका वाहनांसाठी खुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 00:09 IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर एमएमआरडीएने या मार्गावरील वाहतूक सोमवारपासून सुरु केली आहे. भिवंडीतील इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी उद्घाटनाची औपचारिकता टाळल्याने वाहनधारकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. मुंबई नाशिक मार्गावरील वाहनधारकांची दोन्ही बाजूंनी २० ते २५ मिनिटांची बचत होणार आहे. शिवाय, वाहतूक कोंडीही आता फुटणार आहे.

ठळक मुद्दे उद्घाटननाची औपचारिकता टाळल्याने वाहनधारकांमध्ये समाधान मुंबई नाशिक मार्गावरील वाहतूक कोंडी झाली कमी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: उद्घाटनाची अधिकृत वाट न पाहता माणकोली उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू करून वाहनधारकांची गैरसोय टाळावी, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर एमएमआरडीएने या मार्गावरील वाहतूक सोमवारपासून सुरु केली आहे. भिवंडीतील इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी उद्घाटनाची औपचारिकता टाळल्याने वाहनधारकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.नाशिक महामार्गावर माणकोली येथील उड्डाणपुलाच्या ठाणे दिशेने डाव्या मार्गिकेचे लोकार्पण मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच हस्ते इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होणार होते. पालकमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड तसेच इतर लोकप्रतिनिधी यांच्या आॅनलाईन उपस्थितीत सोमवारी दुपारी १.३० वाजता हे लोकार्पण ठरले होते. त्याप्रमाणे एमएमआरडीएने आवश्यक ती तयारीही केली होती. मात्र पहाटे भिवंडी येथे इमारत दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन तसेच लोकप्रतिनिधी यांनी भिवंडी येथे धाव घेतली. मदतकार्य वेगाने सुरू झाले. त्यानंतर हा लोकार्पण कार्यक्र म रद्द करण्यात आला.परंतू केवळ अधिकृत उदघाटन झाले नाही म्हणून उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद ठेवणे आणि वाहनधारकांची गैरसोय करणे बरोबर नाही असे सांगून मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएला उद्घाटननाची वाट न पाहता पुलाची मार्गिका खुली करून वाहतूक सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार एमएमआरडीएचे सह आयुक्त बी. जी. पवार यांनी ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेला तसे आदेश दिल्यानंतर ही मार्गिका वाहतूक शाखेने सोमवारपासून अधिकृतरित्या सुरु केली.*२०१९ मध्ये या आठ पदरी उड्डाणपूलाच्या विरुद्ध बाजूच्या चार पदरी मार्गिकेचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटन केले होते. आता दुसऱ्या बाजूचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते होणार होते. मात्र, उद्घाटनाऐवजी ही मार्गिका थेट सुरु करण्यात आली आहे.

‘‘ २०१३ मध्ये या आठ पदरी उड्डाणपूलाचे बांधकाम सुरु झाले. त्यापैकी एक बाजू २०१९ मध्ये सुरु झाली. तर दुसरी बाजू आता सुरु करण्यात आली. मुंबई नाशिक मार्गावरील वाहनधारकांची दोन्ही बाजूंनी २० ते २५ मिनिटांची बचत होणार आहे. शिवाय, वाहतूक कोंडीही आता फुटणार आहे.’’बी. जी. पवार, सह आयुक्त, एमएमआरडीए, मुंबई

टॅग्स :thaneठाणेroad transportरस्ते वाहतूकMaharashtraमहाराष्ट्र