शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईपाठोपाठ आता ठाण्यातही छटपूजेला बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2020 03:58 IST

कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या वर्षीचे सर्वधर्मीय उत्सव साध्या व घरगुती पद्धतीने साजरे करण्याचा निर्णय घेऊन सामूहिक छटपूजेला परवानगी न देण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती लक्षात घेऊन २० आणि २१ नोव्हेंबर रोजीच्या छटपूजेस मुंबई महापालिका आणि पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता ठाणे पोलिसांनीही शहरातील विविध तलाव, नदी आणि खाडीकिनारीच्या छटपूजेस परवानगी नाकारली आहे. शहरात आधीच जमावबंदी लागू असल्यामुळे छटपूजेसाठी वेगळा आदेश काढलेला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

छटपूजेच्या निमित्ताने निर्माल्य विसर्जित करण्यासाठी भाविक तलाव, नदीकिनारी सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी मोठ्या संख्येने जमा होत असतात. मात्र, कोरोना या साथीच्या आजारामुळे सण तसेच उत्सवाच्या परवानगीसाठी काही प्रतिबंध घातले आहेत. त्यामुळे छटपूजेनिमित्त एकत्र येण्याला परवानगी दिलेली नसल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकारी याने सांगितले. नागरिकांनीही गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाप्रमाणेेच घरीच छटपूजा करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. छटपूजेसाठी अद्याप स्पष्ट आदेश नाहीत. कोरोनासारखा साथीचा आजार लक्षात घेऊन सामाजिक अंतर राखण्यासाठी भाविकांनी एकत्र न येण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

सामूहिक छटपूजेस ठामपाची मनाई

n कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या वर्षीचे सर्वधर्मीय उत्सव साध्या व घरगुती पद्धतीने साजरे करण्याचा निर्णय घेऊन सामूहिक छटपूजेला परवानगी न देण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. यामुळे नागरिकांनी महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी केले.n शहरामध्ये उपवन तलाव, कोलशेत विसर्जन महाघाट, रायलादेवी तलाव, दत्तघाट (मासुंदा तलाव), कोपरी खाडी, पारसिक विसर्जन महाघाट, पारसिक रेतीबंदर या ठिकाणी छटपूजेसाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था केली असून उत्सव कालावधीत नागरिकांनी विशेष करून ज्येष्ठ नागरिक तसेच लहान बालके यांनी घराबाहेर पडू नये, गर्दी करू नये तसेच मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या