शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पैशांसाठी हत्या केल्याने मुंबई पोलीस दलातील पोलीस शिपायाला काशिमीरा पोलिसांकडून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 21:22 IST

मीरा रोड - उसने १ लाख रुपये वसूल करण्यासाठी एका रेती व्यावसायिकाचे आपल्या घरात नेऊन मारहण करून त्याची गळा आवळून हत्या केल्याप्रकरणी मुंबई पोलीस दलातील शिपायास काशिमीरा पोलिसांनी अटक केली.

मीरा रोड - उसने १ लाख रुपये वसूल करण्यासाठी एका रेती व्यावसायिकाचे आपल्या घरात नेऊन मारहण करून त्याची गळा आवळून हत्या केल्याप्रकरणी मुंबई पोलीस दलातील शिपायास काशिमीरा पोलिसांनी अटक केली. आरोपीस ८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मीरा गावात राहणारा मुस्तफा नजीर शेख (३५) हा रेती पुरवठ्याचा व्यवसाय करायचा. बुधवारी रात्री उशिरा त्याचा मृतदेह घोडबंदर गावातील मार्गावर वेलकर फार्म मागे असलेल्या गटारात पडलेला आढळून आला. मुस्तफाने मुंबई पोलिसांच्या कांदिवली पोलीस ठाण्यातील शिपाई बबलू उर्फ मुश्ताक अब्दुल मुलानी (४७) रा. पारिजात अपार्टमेंट, विजय पार्क, मीरा रोड याच्याकडून एक लाख रुपये उसने घेतलेले होते. सदर पैशांसाठी मुश्ताक हा मुस्तफाकडे सातत्याने तगादा लावत होता. तर मुस्तफा मात्र टाळाटाळ करत होता. तो मुश्ताकचे फोन देखील घेत नसे. ३१ आॅक्टोबरच्या दुपारी २ वाजता माशाचा पाडा येथील गॅरेजमध्ये मुस्तफा असल्याचे कळताच मुश्ताकने त्याला तेथे गाठले. तेथे त्याने पैशांची मागणी केली. मुस्तफा याला घेऊन तो राहत असलेल्या इमारतीत गेला.मुस्तफा हा एटीएम कार्ड आणण्यासाठी घरी गेला तर मुश्ताक हा इमारतीखालीच थांबला होता. मुस्तफा कार्ड घेऊन खाली आला असता मुश्ताकने त्याला माझ्या घरी चल व आई वडिलांना सांग की, पैसे देतोय. मुस्तफा मुश्ताक सोबत त्याच्या घरी गेला असता तेथे मुश्ताकने त्याला दमदाटी करुन बांधुन ठेवले व बेदम मारहाण करण्यास सुरवात केली. त्याला मारहाण करण्यासह गळा आवळून त्याची हत्या केली.मुस्तफा मरण पावल्याचे कळताच मुश्ताकने भाऊ मुनीरला सोबत घेतले. दुचाकीवर दोघांच्या मध्ये मुस्तफाचा मृतदेह बसवुन घोडबदर गावच्या मार्गावरील गटारात मृतदेह टाकुन निघुन गेले. दरम्यान घरी एटीएम कार्ड घेण्यासाठी मुस्तफा गेला असता तेव्हा त्याने घरच्यांना मुश्ताक आल्याचे व त्याच्या सोबत घरी जात असल्याचे सांगीतले होते. ३१ आॅक्टोबर रोजी मुस्तफा गेला तो परत न आल्याने त्याची हरवल्याची तक्रार देखील काशिमीरा पोलीसात कुटुंबियांनी दिली होती. पण त्याचा मृतदेह सापडल्याने हत्ये मागे मुश्ताकचा हात असल्याचा दाट संशय पोलीसांसह कुटुंबियांना पण आला. वरिष्ठ निरीक्षक विलास सानप व पोलीस पथकाने आज गुरुवारी मुश्ताक याला मीरा रोड भागातुन अटक केली. ठाणे न्यायालयाने त्याला ८ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.मुश्ताक व मुस्तफा यांची गेल्या ७ ते ८ वर्षांपासूनची ओळख होती. दोघेही दहिसर येथे जवळजवळ रहायचे. मुस्तफाने मुश्ताककडून एक लाख रुपये उसने घेतले होते. पण तो पैसे परत देत नसल्याने मुश्ताकने त्याची हत्या केली. या प्रकरणात मुश्ताकचा भाऊ मुनीर याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले असून, रात्री उशिरापर्यंत त्याला अटक झालेली नव्हती.

टॅग्स :Arrestअटक