शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णाच्या मृत्यूनंतर डोंबिवलीत पुन्हा रुग्णालयाची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 02:07 IST

रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी कल्याणच्या होलीक्रॉस रुग्णालयाची तोडफोड झाल्याच्या घटनेला महिना उलटत नाही, तोच डोंबिवलीमधील एम्स रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाइकांनी तोडफोड केल्याची घटना रविवारी घडली.

डोंबिवली : रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी कल्याणच्या होलीक्रॉस रुग्णालयाची तोडफोड झाल्याच्या घटनेला महिना उलटत नाही, तोच डोंबिवलीमधील एम्स रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाइकांनी तोडफोड केल्याची घटना रविवारी घडली. घटनेत रुग्णालयातील काचेच्या प्रवेशद्वाराची आणि एलसीडी टीव्हीची तोडफोड करण्यात आली. शस्त्राने केलेल्या हल्ल्यात रुग्णालयातील वाहनचालक अजय जाधव जखमी झाला.घेसर-निळजे परिसरात राहणारी नीलम पाटील ही न्यूमोनिया या आजाराने त्रस्त होती. तिला फुफफुसाचा संसर्गही झाला होता. मध्यरात्री तिला उपचारासाठी एम्स रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र, रविवारी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर रुग्णालयात उपस्थित नातेवाइकांनी दरवाजा, टीव्हीची तोडफोड केली. सुरक्षा कर्मचाºयांच्या समक्ष हा तोडफोडीचा प्रकार घडला. हल्ल्याची माहिती स्थानिक मानपाडा पोलिसांना मिळताच वरिष्ठ निरीक्षक गजानन काब्दुले यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोडफोड करणाºयांवर गुन्हे दाखल करणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. एम्सचे संचालक डॉक्टर मिलिंद शिरोडकर आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचे राष्ट्रीय सहसचिव डॉ. मंगेश पाटे हेही रुग्णालयात दाखल झाले. रुग्णालय हल्ल्याप्रकरणी मृताच्या नातवाईकांनी बोलण्यास नकार दिला.प्रकृती गंभीर असल्याचा दावा -नीलमला रुग्णालयात आणण्यात आले, त्याच वेळी तिची प्रकृती गंभीर होती. प्रकृती चिंताजनक असल्याने तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. न्यूमोनियाच्या आजाराने त्रस्त असलेल्या नीलमला फुफफुसाचा संसर्ग झाल्याने त्यात तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्टीकरण एम्सचे जनसंपर्क अधिकारी अवधेश शर्मा यांनी दिले.

टॅग्स :doctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलdombivaliडोंबिवली