शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षांचे २२ हजार परवाने बाद

By admin | Updated: December 4, 2015 00:49 IST

मुदतबाह्य झालेल्या रिक्षा परवान्यांची संख्या वाढल्याने विविध शुल्क भरून ते परवाने नूतनीकरण करण्याची अभय योजना शासनाने हाती घेतली. या मोहिमेला ठाणे आणि पालघर

- पंकज रोडेकर,  ठाणेमुदतबाह्य झालेल्या रिक्षा परवान्यांची संख्या वाढल्याने विविध शुल्क भरून ते परवाने नूतनीकरण करण्याची अभय योजना शासनाने हाती घेतली. या मोहिमेला ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतून अल्प प्रतिसाद लाभल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. दोन्ही जिल्ह्यांतील सुमारे २६ हजारांपैकी ४ हजार २८९ रिक्षा परवानाधारकांनी मोहिमेचा लाभ घेतला. त्यामुळे उर्वरित जवळपास २२ हजार १३२ रिक्षा परवाने कायमस्वरूपी बाद ठरले आहेत. त्यांना आता नव्या लॉटरी पद्धतीतही भाग घेता येणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. या मोहिमेत १२ कोटी ६४ लाखांहून अधिक रुपये शासनाच्या तिजोरीत जमा झाले आहेत. सर्वाधिक जास्त दंडवसुली कल्याण विभागातून तर सर्वात कमी वसई विभागातून झाली आहे. ठाणे प्रादेशिक परिवहन विभागात (आरटीओ) १९९७ पासून आतापर्यंत जवळपास २६ हजार १३२ हजार रिक्षांचेपरवाने मुदतबाह्य झाले होते. ते परवाने नियमानुसार मुदत संपल्यावर सहा महिन्यांत नूतनीकरण न के ल्यास ते रद्द होतात. अशा प्रकारे रद्द झालेल्या परवानाधारकांचे परवाने नूतनीकरणासाठी शासनाने १आॅक्टोबर ते ३१ नोव्हेंबरदरम्यान विशेष मोहीम राबवली होती. याचदरम्यान, दोन वेळेला वाढीव मुदत दिली होती. तरीसुद्धा, त्याला अल्प प्रतिसाद लाभल्याचे दिसते. या मोहिमेंतर्गत ४ हजार २८९ जणांनी महाराष्ट्र मोटार वाहन नियमातील तरतुदीनुसार दरमहा १०० रुपये भरून परवाने नूतनीकरण केले आहेत. ही मोहीम गरजू परवानाधारक तसेच वृद्ध व निराधार महिलांच्या सोयीसाठी राबवण्यात आली होती.शेवटच्या दिवशी दोन कोटींहून अधिक वसुलीशेवटच्या दिवशी ८१५ परवानाधारकांनी परवाने नूतनीकरण केले आहेत. यामध्ये ठाण्यात ३१९, कल्याण- २१६, नवी मुंबई २३२ आणि वसईत ४८ नूतनीकरणाची संख्या आहे. ८१५ परवानाधारकांक डून दोन कोटी ३३ लाख १७ हजार ३३६ रुपये दंड वसूल केला. नूतनीकरण न करण्यामागची कारणेपरवानाधारकाचा मृत्यू झाला असावा, तसेच त्याची नूतनीकरणाची इच्छा नसावी, आर्थिक अडचणी आदी बाबींची शक्यता नाकारता येत नाही. आरटीओ कारवाईचा तक्ताविभागमुदतबाह्य आॅटो रिक्षाकायमस्वरूपीदंड परवाने नूतनीकरण संख्याबाद परवानेवसुलीठाणे७४९३१४८६६००७३,७१,५४,३९९कल्याण१००५११७७२८२७९६,४२,११,९०८नवी मुंबई५३७३८९०४४८३२,१६,१०,५००वसई३५०४१४१३३६३३४,९६,९०६एकूण२६१३२४२८९२२,१३२१२,६४,७३,७१३युनियनच्या सहमतीने शुल्क निश्चित केले होते. त्यानुसार, शुल्क आकारून नूतनीकरण मोहीम शासनाने राबवली. ज्यांनी याचा लाभ घेतला नाही, त्या उर्वरितांचे परवाने आता कायमस्वरूपी बाद झाले आहेत. तसेच त्यांना नव्या कोणत्याच लॉटरी पद्धतीत सहभागी होता येणार नाही. - विकास पांडकर, आरटीओ अधिकारी, ठाणे