शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

पालघर मधील ऍरो मॉडेलिंगमध्ये सुखोई-३०, तेजस, फिनिक्स ग्लायडर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 23:10 IST

रोटरी क्लबने पालघर मध्ये आयोजित ऍरो मॉडेलिंग शो मध्ये सुखोई-३०, तेजस, फिनिक्स ग्लायडर ह्या विमानाच्या प्रतिकृती असलेल्या विमानांच्या हवेतील चित्तथरारक कवायती पाहून उपस्थित हजारो विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले.

पालघर : रोटरी क्लबने पालघर मध्ये आयोजित ऍरो मॉडेलिंग शो मध्ये सुखोई-३०, तेजस, फिनिक्स ग्लायडर ह्या विमानाच्या प्रतिकृती असलेल्या विमानांच्या हवेतील चित्तथरारक कवायती पाहून उपस्थित हजारो विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले.पालघरच्या आर्यन हायस्कुलच्या मैदानावर रोटरी क्लब ऑफ पालघर च्या वतीने शनिवारी एरो मॉडेलिंग शो चे आयोजन करण्यात आले होते. बोईसरचे उद्योजक नितीन अगरवाल यांच्या हस्ते या कार्यक्र माचे उद्घाटन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री विष्णू सवरा, नगराध्यक्ष उत्तम पिंपळे, रोटरी अध्यक्ष मयूर काशीकर, कार्यक्र म प्रमुख भगवान पाटील, अरुण पाटील, दीपेश ठाकूर, प्रशांत पाटील, जयेश आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते.तालुक्यातील आर्यन हायकुल, आदर्श विद्यामंदिर केळवे, जीवन विकास, जिप नवली, यमुना यशवंत हायस्कुल शिरगाव आदी १६ ते १७ शाळेतील हजारो विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनी आपला सहभाग नोंदवला होता. विमानाचे उडणे हे विद्यार्थ्यांसह सर्वसामान्यांमध्ये एक कुतूहल आणि आश्चर्य समजले जात असताना शेकडो टनाचे विमान हवेत कसे तरंगते? धावपट्टीवर कसे उतरते? अशा विद्यार्थ्यांच्या मनातील अनेक शंकांचे निरसन या कार्यक्रमातुन करण्यात आले.सातारा येथील सदानंद काळे यांनी सुखोई, तबकडी, तेजस, सेसना, स्काय मास्टर, फोनिक्स ग्लायडर आदी १२ विमानांच्या प्रतिकृती मैदानात ठेवून त्यांचा पुत्र अथर्व काळे यांनी आपल्या जवळील रेडिओ कंट्रोल रिमोट च्या सहाय्याने ही सर्व विमाने हवेत उडवून दाखिवली. सुखोई विमानाच्या कसरती, हवेतला पाठलाग, आकाशातील पुष्पवृष्टी, आदी चित्तथरारक कवायतीचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला.विमानाचे तंत्रज्ञान ८ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात यायला हवे असे सांगून कार्यानुभव (क्राफ्ट) च्या शिक्षकांनी विमानाची प्रतिकृती बनविण्याचे ज्ञान विद्यार्थ्यांना दिल्यावर त्यातील तंत्रज्ञानाची माहिती विज्ञानाच्या शिक्षकांनी दिल्यास विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण होऊन देशाला चांगले पायलट व इंजिनिअर मिळू शकतात असा आशावाद काळे यांनी लोकमत कडे व्यक्त केला.

टॅग्स :palgharपालघरStudentविद्यार्थी