शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत बांधकामांना प्रशासनाचे पाठबळ; महासभेत गंभीर आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 01:19 IST

कारवाई करण्याचे महापौरांचे प्रशासनाला आदेश

ठाणे :  ठाणे शहराच्या विविध भागांत अनधिकृत बांधकामे उभी राहत आहेत. फेरीवाल्यांचे प्रस्थ वाढले आहे. त्यावर कारवाई करण्याची मागणी केल्यानंतर सहायक आयुक्त सांगतात की, आम्हाला सौम्य कारवाई करण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे अनधिकृत बांधकामांना आणि फेरीवाल्यांना पाठीशी कोण घालत आहे, असा सवाल शुक्रवारी सर्वपक्षीय नगरसेवकांनी महासभेत केला. कोरोना काळातही रात्रभर हुक्का पार्लर, बार सुरू असल्याची धक्कादायक बाबही यावेळी नगरसेवकांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या बार, हुक्का पार्लरसह अनधिकृत बांधकामे आणि फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी प्रशासनाला दिले.सौम्य कारवाई करण्याच्या सूचना सहायक आयुक्तांना कुणी केल्या आहेत, असा सवाल नगरसेविका मीनल संखे यांनी केला. हाच मुद्दा धरून मृणाल पेंडसे यांनी नौपाडा किंवा स्टेशन परिसरातही फेरीवाल्यांवर सौम्य कारवाई केली जाते. अधिकारी या फेरीवाले, तसेच अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालत आहे का, असा सवाल त्यांनी केला. अनधिकृत बांधकामे तर वाढत आहेतच, शिवाय शहरात रात्रीचे हुक्का पार्लर, बार राजरोसपणे सुरू असल्याची माहिती नगरसेवक भरत चव्हाण यांनी दिली. त्यांच्यावर का कारवाई होत नाही, असा सवालही त्यांनी केला. या संदर्भात एक समिती नेमण्याची मागणी नगरसेवक राम रेपाळे यांनी केली, परंतु समिती स्थापन करून उलट नगरसेवकच बदनाम होतात. त्याऐवजी शासन आदेशानुसार पालिकेने नव्याने उभ्या राहिलेल्या अनधिकृत बांधकामांची माहिती सभागृहासमोर आणावी, अशी मागणी नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी केली.सौम्य कारवाईच्या सूचना नाहीतसहायक आयुक्तांना सौम्य कारवाईबाबत प्रशासनाकडून कोणतेही आदेश नसल्याची माहिती अतिक्रमण उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांनी सभागृहास दिली. तक्रारी आल्यानंतर तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना केल्याचेही त्यांनी सांगितले. दुसरीकडे महापौर नरेश म्हस्के यांनी शहरात रात्रीच्या सुमारास जे काही बार, हुक्का पार्लर सुरू आहेत, त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याची, तसेच अनधिकृत बांधकामे किंवा फेरीवाल्यांबाबत तक्रारी आल्या तर त्यांच्यावरही तत्काळ कारवाई करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका