शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरे करणार शक्तिप्रदर्शन; असा असेल ठाणे दौरा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2024 20:17 IST

आदित्य ठाकरे हे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात शक्तिप्रदर्शन करणार असल्याचे दिसत आहे.  

अजित मांडके, ठाणे : काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाणे दौरा केला असतानाच आता त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे हे ठाणे दौऱ्यावर येत आहेत. रविवारी सांयकाळी ते ठाण्यातील विविध पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करणार असून येथील शिवसेना शाखांना देखील भेटी देणार आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखाडी या मतदार संघात असलेल्या शाखेचा शुभारंभ देखील आदित्य यांच्या हस्ते केला जाणार आहे. त्यामुळे एक प्रकारे आदित्य ठाकरे हे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात शक्तिप्रदर्शन करणार असल्याचे दिसत आहे.  

ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे, किंबहुना आजही तो आहे. परंतु मागील दोन वर्षापूर्वी शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर आता ठाण्याची शिवसेना कोणाची, यासाठी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात जोरदार चुरस लागली आहे. शिंदे यांच्याकडे शिवसेनेतील बहुसंख्य नगरसेवकांचे पाठबळ आहे. तर उद्धव ठाकरे यांच्याकडे एक खासदार आणि काही नगरसेवकांचे पाठबळ आहे. त्यातही येथील शाखांवर देखील शिंदे यांच्या शिवसेनेचा ताबा आहे. मात्र ठाण्यातील शिवसेना कुठेच गेलेली नसून ती आमच्याकडेच असल्याचा दावा संजय राऊत नुकताच ठाण्यात केला होता. काही महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी मुंब्र्यातील तोडलेल्या शाखेला भेट दिली होती. तसेच मुंब्रा, कळवा आणि ठाण्यात शक्तिप्रदर्शन केले होते. दिव्यात आदित्य ठाकरे यांनी देखील दोन महिन्यांपूर्वी शक्तिप्रदर्शन केले होते. त्यानंतर आता पुन्हा आदित्य ठाकरे हे ठाण्यातील घोडबंदर भागात आणि शहरातील मध्यवर्ती भागात येऊन पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. तसेच शाखांना देखील भेटी देणार आहेत. 

आदित्य ठाकरेंचे मुंबईच्या वेशीवर म्हणजेच आनंद नगर जकात नाका आणि नंतर जागो जागी जंगी स्वागत केले जाणार आहे. कोपरी पाचपाखडी या  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात जिजामाता नगर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नवीन शाखेचे उद्घाटन आदित्य यांच्या हस्ते होणार आहे. या शाखेच्या ठिकाणी ते भाषणही करण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी घोडबंदर येथील नरेश मणेरा यांच्या शाखेला, चंदणवाडी शाखेला भेट देऊन पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्याच्या निमित्ताने कायदा सुव्यवस्था पाहता मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

असा असेल आदित्य ठाकरे यांचा ठाणे दौरा 

घोडबंदर रोड -आनंद नगर शाखा (नरेश मणेरा) – सायं. ६:०० वा.मानपाडा रोड-मनोरमा नगर शाखा  संतोष शिर्के  प्रदीप पूर्णेकर) – सायं. ७:०० वा.ठाणे महापालिका जवळ- चंदनवाडी शिवसेना शाखा – रात्री ८:०० वा.समता नगर- जिजामाता नगर शिवसेना शाखा उद्घाटन  अमोल हिंगे संजय दळवी रात्री. ९:०० वा. 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेthaneठाणे