शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
3
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
4
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
5
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
6
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
7
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
8
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
9
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
10
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
11
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
12
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
13
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
14
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
15
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
16
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
17
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
18
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
19
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
20
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव

आदित्य ठाकरेंनी केली मुख्यमंत्र्यांची नक्कल, टाळ्या, शिट्ट्या अन् 'वन्स मोअर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 22:09 IST

शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना दोन दिवसापूर्वी झालेल्या मारहाणीनंतर बुधवारी ठाण्यात महाविकास आघाडीचा जनप्रक्षोभ मोर्चा काढण्यात आला होता.

मुंबई/ठाणे -  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी आज ठाण्यात जबरी सभा घेतली. या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह महायुती सरकावर आदित्य यांनी जोरदार प्रहार केला. ठाण्यातील रोशनी शिंदे मारहाण प्रकरणावरुन त्यांनी शिंदे गटाला इशाराच दिला. तर, जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नक्कलही केली. आदित्य यांच्या या कृत्यावर उपस्थितांमधून वन्स मोअरचा प्रतिसाद आल्याचे दिसून आले.  

शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना दोन दिवसापूर्वी झालेल्या मारहाणीनंतर बुधवारी ठाण्यात महाविकास आघाडीचा जनप्रक्षोभ मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर, दिवंगत आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळावर झालेल्या सभेत आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात महिलेवर अत्याचार होत असतांना मुख्यमंत्री एक शब्दही बोलत नसल्याचे आर्श्चय वाटते. आजही, मोर्चा काढतांनाही काही अटी टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे मी इथे घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यासाठी नाही तर कौतुक करण्यासाठी आल्याचे सांगत आदित्य यांनी टीकेची झोड उठविली.

महिलांवर हात उचलायचा, सुषमाताईंवर शिवीगाळ करायची, सुप्रियाताईंवर शिवीगाळ करायची. पण, मर्दानगी दाखवायची... असे म्हणत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंची जाहीर सभेत नक्कलच केली. असा शर्ट खाली करायचा, असं वरतीसरती बघत, मग दाढी खाजवून दाखवत आदित्य यांनी मुख्यमंत्र्यांची नक्कल केली.

आदित्य ठाकरेंनी काकांचा गुण घेत थेट जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांची नक्कल केली. त्यावेळी, उपस्थित लोकांनी टाळ्या शिट्ट्या वाजवत आदित्य यांच्या कृत्याला दाद दिली. तसेच, वन्स मोअर वन्स मोअर... ची घोषणाबाजीही केली. मात्र, अशी माणसं ओन्ली वन्स असतात, त्यांना पुन्हा येऊ द्यायचं नाही, असे म्हणत पुन्हा नक्कल करणं आदित्य यांनी टाळलं. मात्र, पुढील काही मनिटांतच पुन्हा एकदा शर्ट खाली खेचत त्यांनी शिंदेंची नक्कल केली. 

जेलमध्ये भरणार ही शपथ घ्यायला आलोय

तुम्हाला आज सांगतोय मी, हे सरकार काही महिन्यांचं नाही, काही दिवसांचं नाही, तर काही तासांचं आहे. पडल्यानंतर सगळ्यांची मोजमापं करणार. कधी आम्ही बदल्याच्या भूमिकेत काम करत नाही, पण जे लोकांसाठी गरजेचं आहे, ते केल्याशिवाय राहणार नाही हेच आज सांगायला इथे आलोय, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर व महायुती सरकारवर निशाणा साधला. जे कोणी अधिकारी असतील, आयएएस असतील, आयपीएस असतील, त्या गद्दार गँगमधील चिलटी असतील, त्यांना सांगतोय मी. सरकार आल्यानंतर चौकशी करणार म्हणजे करणार आणि जेलभरो आंदोलन घेणार आहे. आंदोलन नव्हे, हे आंदोलनजीवी नाहीत, तुम्हाला सगळ्यांना जेलमध्ये भरणार, हीच शपथ घ्यायला दिघे साहेबांच्या शक्तीस्थळावर मी आलोय, असे म्हणत आदित्य यांनी ठाकरी शैलीत शिंदे गटावर निशाणा साधला. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाAditya Thackreyआदित्य ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेthaneठाणे