शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक गुन्ह्यांवर अप्पर पोलीस महासंचालकांचा वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 01:30 IST

सर्व जिल्ह्यांत ठेवणार समन्वय : नीरव मोदी, विजय मल्ल्यामुळे आली जाग

ठाणे : राज्यातील भाजपा सरकारच्या काळात मुंबई शहराच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे १८४ गुन्ह्यांत १९ हजार ३१७ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाल्याने, आता अशा गुन्ह्यांवर वॉच ठेवून त्यांना आळा घालण्यासाठी सरकारने अपर पोलीस महासंचालक (आर्थिक गुन्हे) हे पद व इतर १७ सहायक पदे निर्माण करण्यास मान्यता दिली आहे.वाढती लोकसंख्या, शहरीकरण, औद्योगिकीकरण, तंत्रज्ञान व संगणकीकरण यामुळे ई-पेमेंटद्वारे होणारे व्यवहार वाढले आहेत. बांधकाम व्यवसाय, तसेच अन्य नवनवीन क्षेत्रांसह व्यापार उद्योगधंद्यातील आर्थिक घोटाळे, आर्थिक फसवणुकींच्या गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नीरव मोदी, मेहुल चोकसी, विजय मल्ल्या, डी. एस. कुलकर्णी यांच्यासह इतर आर्थिक घोटाळ्यांमुळे उशिरा का होईना जाग आल्याने, सरकारने महासंचालकपद व अतिरिक्त पदांना मंजुरी दिली.आर्थिक गुन्ह्यांना बसणार आळाआर्थिक गुन्हे होऊ नयेत. भविष्यात शासन, न्यायप्रणाली व इतर क्षेत्रातील तज्ज्ञ, तपास अंमलदार/अधिकारी यांच्याशी समन्वय साधून, त्यावर उपाययोजना करून नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे, राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आर्थिक गुन्ह्यांच्या न्यायप्रविष्ट असलेल्या प्रकरणांचा निपटारा जलद गतीने करून, त्यावर नियंत्रण आणण्यासाठी, तसेच उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय व स्थानिक न्यायालयातील प्रकरणांचा आढावा घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी नव्या अपर पोलीस महासंचालकांवर सोपवली आहे.मुंबईत १९,३१७ कोटींहून अधिक फसवणूकजितेंद्र घाटगे या माहिती अधिकार कार्यकर्त्याने मागविलेल्या माहितीत एकट्या मुंबई शहराच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे १८४ गुन्ह्यांत १९ हजार ३१७ कोटींहून अधिक रकमेच्या आर्थिक गुन्ह्यांची नोंद झाल्याची माहिती उपलब्ध झाली होती. यात २०१५ मध्ये ५५६० कोटी, २०१६ मध्ये ४२७३ कोटी, २०१७ मध्ये ९,८३५ कोटींच्या आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांचा समावेश होता. विशेष म्हणजे, यात राज्यातील ठाणे, पुणे, नवी मुंबई, नागपूरसह इतर मोठ्या शहरांतील आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांचा समावेश नाही.सद्य:स्थितीत राज्यातील सर्व पोलीस आयुक्तालये व सर्व जिल्ह्यांमध्ये स्थानिकगुन्हे अन्वेषण विभागातून व काही ठिकाणी आर्थिक गुन्हे शाखा/ पथक तयार करून सहायक पोलीस आयुक्त / पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी आर्थिक गुन्ह्यांची उकल करण्याचे काम पाहत आहेत. त्यांच्यावर देखरेख ठेवून मार्गदर्शन, समन्वय, नियंत्रण व उपाययोजना करण्यासाठी राज्यपातळीवर आर्थिक गुन्ह्यांशी संबंधित वरिष्ठ दर्जाचे पर्यवेक्षकीय पद अस्तित्वात नाही. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील विद्यमान पोलीस उपअधीक्षकांवर नियंत्रण, मार्गदर्शन व आर्थिक तपासात सुसूत्रता आणण्यात नवे अपर पोलीस महासंचालकपद मार्गदर्शक ठरणार आहे.

टॅग्स :Nirav Modiनीरव मोदीVijay Mallyaविजय मल्ल्या