शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

घरगुती उत्सवावर भर, मूर्तींना मागणी वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2021 00:17 IST

maghi ganpati 2021 : उद्यापासून माघी गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. परंतु, कोरोनामुळे भाद्रपदमधील गणेशोत्सवास असणाऱ्या अटी व नियमांचे पालन करण्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

- प्रज्ञा म्हात्रे

ठाणे : दरवर्षी भाद्रपद महिन्यात घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्या ठाण्यातील काही भाविकांनी यंदा माघी गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दरवर्षीपेक्षा यंदा घरगुती माघी गणेशोत्सव साजरा करण्याचे प्रमाण वाढल्याने मूर्तीनाही  ३० टक्क्यांनी मागणी वाढल्याचे मूर्तिकारांनी सांगितले. त्याचप्रमाणे दरवर्षी पाच, सात, दहा दिवसांवर माघी गणेशोत्सव साजरा करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कोरोनामुळे दीड दिवसांचा साजरा करणार आहे.उद्यापासून माघी गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. परंतु, कोरोनामुळे भाद्रपदमधील गणेशोत्सवास असणाऱ्या अटी व नियमांचे पालन करण्याचे प्रशासनाने सांगितले आहे. त्यामुळे यंदाचा माघी गणेशोत्सव हा सर्वत्र साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय सार्वजनिक मंडळांनी घेतला आहे. आमच्याकडे सार्वजनिकपेक्षा घरगुती गणेशोत्सवासाठी मूर्ती घेऊन गेले आहेत. घरगुती गणेशोत्सवासाठी अडीच फुटांपर्यंत मूर्ती बनविण्यात आल्याचे मूर्तिकार प्रसाद वडके यांनी सांगितले.उंचीचे बंधन असल्याने यंदा चार फुटांपर्यंतच मूर्ती बनविण्यात आल्या आहेत. मूर्तींचे दर वाढविले नसल्याचे मूर्तिकार अरुण बोरिटकर यांनी सांगितले. तसेच सार्वजनिकपेक्षा घरगुती गणेशोत्सवासाठी मूर्तींची नोंदणी झाल्याचे ते म्हणाले. दरवर्षी सार्वजनिक माघी गणेशोत्सवात भजन, कीर्तन, हळदी- कुंकू, सांस्कृतिक कार्यक्रम, आरोग्य शिबीर, बालकलाकारांसाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. यंदा कोरोनामुळे या कार्यक्रमांना ब्रेक लागला आहे. यावेळेस मंडळांनी दर्शन आणि प्रसादाचे आयोजन केले आहे. उकडीच्या मोदकांना यंदा मागणी वाढली आहे. मोदकांचा दर वाढविण्यात आले नसून उकडीच्या मोडकांमध्ये उकडीचा आंबा मोदक हा प्रकार पाहायला मिळत आहे. उकडीचा छोटा मोदक २१ रु प्रतिनग, मोठा मोदक २८ रु. प्रतिनग तर उकडीचा आंबा मोदक ३० रु. प्रतिनग असल्याचे प्रविणा नाईक यांनी सांगितले. आठ दिवस आधी भाविकांनी उकडीच्या मोदकांचे बुकिंग केल्याचे नाईक म्हणाल्या.

नौपाडा सार्वजनिक माघी गणेशोत्सवाचे यंदाचे हे ९० वे वर्षे असून दरवर्षी सात दिवसांचा हा उत्सव साजरा करण्यात येतो. तसेच विविध उपक्रमही आयोजित केले जातात. यंदा हा माघी गणेशोत्सव दीड दिवसांचा तसेच अत्यंत साधेपणाने साजरा केला जाणार असून दर्शनासाठी भाविकांनी येऊ नये, असे आवाहन केले आहे.- अच्युत दामले, नौपाडा सार्वजनिक माघी गणेशोत्सव

यंदा आम्ही मिरवणूक, भजन रद्द केले आहे. मास्क नाही त्याला प्रवेश नाही, असा बॅनर आम्ही लावणार आहोत. खबरदारीचा सर्व उपाययोजना केल्या जाणार आहेत.- गौरव चव्हाण, राबोडी कोळीवाडा माघी गणेशोत्सव

रस्त्यावर यंदा मंडप न घालता प्रतिष्ठानच्या कार्यालयात गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली जाईल. दरवर्षी होणारे विविध कार्यक्रम आम्ही रद्द केले आहेत. दरवर्षी सात दिवसांचा असलेला हा माघी गणेशोत्सव दीड दिवसांवर साजरा करणार असून मूर्तीची उंचीही पाच फुटांवरून सव्वादोन फुटांवर केली आहे. - संतोष उबाळे, जनसेवा प्रतिष्ठान, माघी गणेशोत्सव

कोरोनामुळे पारंपरिक पेढे, मोदकांवर भाविकांचा भर आहे.- निलेश कार्ले, दुकान मालक

मिठाईवर कोरोनाचा परिणाम नाही. उद्या सकाळी भाविक खरेदीसाठी येतील. कोरोनामुळे मिठाई मर्यादित प्रमाणात बनविली आहे.- नितीन भोईर, दुकानमालक

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवthaneठाणे