शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

नागरीकांच्या दैनंदिनी गरजांशी डीजी ठाणे प्रकल्प जोडा, आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 17:24 IST

डीजी ठाणे प्रकल्पाच्या व्याप्तीसाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पावले उचलली आहेत. त्यानुसार ज्या प्रभाग समितीमध्ये जास्तीत ज्सात डीजी ठाणे अ‍ॅप डाऊनलोड केले जाईल त्या प्रभागात डीजी ठाणे समुदाय मागणी करणे ती विकासकामे करण्यासाठी १० कोटींची तरतूद करण्याचे सुतोवाच आयुक्तांनी केले आहेत.

ठळक मुद्देप्रभाग समितीसाठी मिळणार १० कोटींची विकास कामेशाळा महाविद्यालयांबरोबर समन्वय साधला जाणार

ठाणे - देशातील पहिला महत्वांकाक्षी प्रकल्प ठरलेल्या डीजी ठाणे प्रकल्पाची व्याप्ती वाढविण्याबरोबरच नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी त्याला जोडण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले. सोमवारी नागरी संशोधन केंद्र येथे डीजी ठाणे प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना हे निर्देश दिले. विशेष म्हणजे ज्या प्रभाग समितीमध्ये जास्तीत जास्त डीजी ठाणे अ‍ॅप डाऊनलोड केले जाईल त्या प्रभागात डीजी ठाणे समुदाय मागणी करेल ती विकासकामे करण्यासाठी १० कोटींची तरतूद करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.                  या बैठकीला उपायुक्त (मुख्यालय) संजय निपाणे, उपायुक्त (जनसंपर्क) संदीप माळवी, डीजी ठाणे प्रकल्पाचे अंकित भार्गव, एचडीएफसी बँकेचे अजीज गांधी आदी उपस्थित होते. यावेळी आयुक्तांनी हा प्रकल्प नागरिकांच्या दैनंदिन कामाकाजाशी निगडीत आहे. त्यांमुळे या प्रकल्पाची व्याप्ती वाढवून हा प्रकल्प त्यांच्या दैनंदिन गरजांशी जोडण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर डीजी ठाणे अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर महापालिकेच्यावतीने अंतर्गत आणि विविध व्यापाºयांकडून जे फायदे देण्यात येणार आहेत. ते फायदे नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रभाग समिती स्तरावरही माहिती उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. दरम्यान या प्रकल्पाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी शहरातील सर्व गृहनिर्माण संस्था, शाळा, महाविद्यालयांशी समन्वय साधून या प्रकल्पाचे महत्व समजून सांगण्यासाठी यंत्रणा निर्माण करण्याचे आदेश त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले.याशिवाय ज्या प्रभाग समितीमध्ये जास्तीत जास्त डीजी ठाणे अ‍ॅप डाऊनलोड केले जातील त्या प्रभागामध्ये डीजी ठाणे समुदाय मागणी करेल ती विकासकामे करण्यासाठी १० कोटी रूपयांची तरतूद करण्याच्या सूचना मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना दिल्या. सदरचा निधी हा विविध प्रभाग समितीमधील विकासकामासाठी वापरण्यात येणार आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाdigitalडिजिटल