शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

बॉस-शेठच्या मनोमिलनाने कार्यकर्ते झाले अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2020 01:32 IST

बॅनरबाजी, निवडणुकीत भिडल्याने वितुष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाण्यातील राजकीय वर्तुळात ‘बॉस’ अशी ओळख असलेले गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि ‘शेठ’ म्हणून परिचित असलेले आ. प्रताप सरनाईक यांना वर्तकनगर पोलीस वसाहतीच्या प्रकल्पाने झटपट जवळ आणले. १२ वर्षांचा दुरावा हे दोघे झटपट विसरले. मात्र बॅनरबाजी, निवडणूक प्रचारावरून परस्परांना अक्षरश: भिडलेले, शिवीगाळ केलेले उभयतांचे कार्यकर्ते अवाक् झाले आहेत. कालपर्यंत ज्यांना पाण्यात पाहिले त्यांच्या गळ्यात गळे कसे घालायचे, असा सवाल खासगीत कार्यकर्ते करीत आहेत.

राजकीय पक्ष असो की नेते अनेकदा किरकोळ मुद्द्यावरून, निवडणूक प्रचारावरून अथवा पोस्टर-बॅनर लावण्यावरून त्यांच्यात तीव्र मतभेद होतात. अशावेळी पक्ष किंवा नेत्यासोबत आपली निष्ठा घट्ट असल्याचे दाखविण्याकरिता ‘कार्यकर्ता’ एकमेकांना भिडतो. मात्र राजकारणात सत्तेकरिता अनेकदा स्वार्थी युती-आघाड्या होतात. पण, ठाण्यात बॉस-शेठ जसे एक तपाचे राजकीय वैर विसरून चुटकीसरशी एकत्र येतात तेव्हा खरी गोची होते ती कार्यकर्त्याची.

आम्ही आजही ते दिवस विसरलो नसल्याचे दोघांचे कार्यकर्ते सांगत आहेत. १२ वर्षांपूर्वी म्हणजेच २००८ पूर्वी ठाण्यातील राजकारणात आव्हाड आणि सरनाईक ‘दो हंसो का जोडा’ म्हणून ओळखले जायचे. २००८ साली सरनाईक यांनी ठाणे महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदाच्या वादावरून राष्ट्रवादीतून बाहेर पडून शिवबंधन हाती बांधत शिवसेनेत प्रवेश केला. त्या वेळी त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची मोठी फळी होती. आव्हाडांकडे त्या मानाने तुलनेत कार्यकर्त्यांची फळी कमी होती. काही वेळेस या दोघांचे खंदे समर्थक आपसात भिडतानाही दिसून आले. ठाण्यात या दोघांमधील बॅनरवॉर चांगलेच चर्चेचा विषय ठरले होते. एकाच्या बॅनरवर दुसऱ्याने बॅनर लावणे, समोरासमोर बॅनर लावणे यावरून या दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये वितुष्ट आले होते. एकेकाळी जे आमचे मित्र होते, ज्यांच्यासोबत आम्ही एकत्र खात-पीत होतो त्यांनाच अनेकदा शिवीगाळ केली. काही भागात त्यांचे कार्यकर्ते राहतात म्हणून तेथे गेलो नाही. पोलिसांची गुन्हे दाखल करण्याची दमदाटी सहन केली. आता आम्ही द्विधा मन:स्थितीत आहोत, असे कार्यकर्ते म्हणाले.मनाची तयारी नाहीआव्हाड-सरनाईक एकत्र आले तेव्हा कट्टर समर्थकांनी तेथे येण्याचे टाळले, असे कबूल केले. आजही आमच्या मनाची तयारी झालेली नाही. आव्हाड मंत्री आहेत. सरनाईकांनाही मंत्रिपदी पाहायचे आहे. दोघे मंत्री असताना एकत्र आले असते तर त्याचा जास्त आनंद झाला असता, असे सरनाईक यांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. हे दोघे १२ वर्षे एकत्र असते तर आज ठामपामध्ये राष्ट्रवादीची सत्ता असती, असा दावा आव्हाड यांच्या पदाधिकाºयांनी केला. दोघांमधील वितुष्टाने त्यांचे व आमचे राजकीय नुकसान झाले. अशी दोन्हीकडील कार्यकर्त्यांची भावना आहे.

टॅग्स :Jitendraजितेंद्रpratap sarnaikप्रताप सरनाईक