शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

क्षयरुग्णांची नोंदणी न केल्यास होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 00:07 IST

ठामपाचे निर्देश; रूग्णालय रडारवर

ठाणे : केंद्र सरकारने क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम जाहीर केला असून या अनुषंगाने ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात क्षयरोगांवर उपचार करणाऱ्या सर्व रुग्णालयांनी त्यांच्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची नोंदणी सक्तीची केली आहे. यासाठी महापालिकेने सर्व रुग्णांना तसे निर्देश दिले असून यामध्ये हलगर्जीपणा केल्यास कारवाई करण्यात येईल, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.प्रत्येक क्षयरोगावर उपचार होऊन क्षयरोगाचा प्रसार रोखता यावा यासाठी खासगी रुग्णालये व संस्थांना क्षयरुग्णांची नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. प्रत्येक क्षयरुग्णांची नोंदणी होऊन त्यांच्यावर उपचार करणे व क्षयरोगाचा प्रसार रोखणे, नियमित उपचारात प्रतिसाद न देणाऱ्या क्षयरोगाच्या वाढत्या प्रसारास आळा घालण्यासाठी उपाययोजना करणे हा या नोंदणीमागील मुख्य उद्देश आहे.नोंदणी करणे अनिवार्य असलेल्या खासगी क्षेत्रातील वैद्यकीय क्षेत्रामध्ये क्षयरोग निदान करणाऱ्या शहरातील सर्व पॅथॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, प्रयोगशाळा, रेडिओलॉजी, सुविधा असलेल्या संस्था, क्षयरोगावर उपचार करणारे विविध पॅथॉलॉजी, सर्व रुग्णालये, डॉक्टर्स, सर्व बाह्यरुग्ण व आंतररुग्ण सुविधा, क्षयरोगाची औषधे विक्री करणारे विक्रेते, केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट यांचा समावेश यामध्ये असणार आहे.ज्या प्रयोगशाळा डॉक्टर्स, रुग्णालये, औषध विक्रेते, क्षयरोगाची नोंदणी करणार नाहीत अशा संस्था, व्यक्तींना क्षयरोगाचा प्रसार करण्यासाठी जबाबदार धरून अशा सर्वांवर भारतीय दंड विधान कलम २६९, २७० नुसार कारवाई करण्यात येईल. याअंतर्गत दोषी ठरलेल्या व्यक्तींवर ‍किमान ६ महिने ते २ वर्षांपर्यंत कारावास व दंडाची शिक्षा करण्यात येईल, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहेृ. यासंदर्भात ज्या प्रयोगशाळा, डॉक्टर्स, रुग्णालये, औषध विक्रेते यांनी क्षयरोगांची नोंदणी करण्यामध्ये टाळाटाळ करून राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला यास्तव क्षयरोग अधिकारी डॉ. प्रसाद पाटील व वैद्यकीय अधिकारी राजू मुरूडकर यांच्या स्वाक्षरीने संबंधितांना समज दिली आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका