शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सीआरझेड बफर झोनमधील बांधकामांवर होणार कारवाई, आयुक्तांनी केली समिती गठीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 19:05 IST

न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर ठाणे महापालिकेने सीआरझेड बफर झोन मधील बांधकामांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या संदर्भात एक समिती गठीत करण्यात आली असून लवकरच ही कारवाई अपेक्षित धरण्यात आली आहे.

ठळक मुद्देड्रोन कॅमेरेद्वारे केला जाणार सर्व्हेखारफुटींची कत्तल करणाऱ्यांवर होणार कारवाई

ठाणे - ज्या ठिकाणी खारफुटीचे क्षेत्रफळ एक हजार चौरस मीटरपेक्षा जास्त आहे त्या ठिकाणी ५० मीटर या ना बांधकाम क्षेत्रात उभ्या राहिलेल्या बांधकामावर कारवाई करण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या पाशर््वभूमीवर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अतिरिक्त आयुक्त (१) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा महत्वाचा निर्णय सोमवारी घेण्यात आला.                     मुंबई उच्च न्यायालयाने अलीकडेच ज्या ठिकाणी खारफुटीचे क्षेत्रफळ एक हजार चौरस मीटरपेक्षा जास्त आहे त्या ठिकाणी ५० मीटरच्या ना बांधकाम क्षेत्रात जी बांधकामे उभी राहिली आहेत त्या बांधकामावर कारवाई करून ते क्षेत्र २००५ रोजीच्या स्थितीत आणण्याचे आदेश दिले होते. त्या पाशर््वभूमीवर सोमवारी महापालिका आयुक्त आयुक्तांनी त्या संदर्भात अतिरिक्त आयुक्त (१) राजेंद्र अहिवर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्याचा निर्णय घेतला. या समीतीमध्ये उपायुक्त(जनसंपर्क), उपायुक्त (अतिक्र मण), शहर व नियोजन अधिकारी प्रमोद निंबाळकर, प्रदूषण नियंत्रण अधिकारी, शहर विकास विभागाचे कार्यकारी अभियंता शैलेंद्र भेंडाळे आदींचा समावेश आहे. कोकण विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील समिती ज्या पद्धतीने काम करते त्याच पद्धतीने ही समिती कामकाज करेल असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.यावेळी त्यांनी सद्यस्थितीत महापालिका हद्दीची सॅटेलाईट प्रतिमा तयार करून आजची परिस्थिती आणि २००५ रोजीची स्थिती यामध्ये असलेल्या तफावतीचा आढावा घेणे, खारफुटीच्या क्षेत्राचे ड्रोन कॅमेराद्वारे चित्रीकरण करणे, त्या ठिकाणी अतिक्र मणे होवू नयेत म्हणून त्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याबाबत संबंधित विभागास कळविणे, ज्या ठिकाणी खारफुटीची कत्तल झाली आहे त्या प्रकरणी अज्ञात लोकांविरूद्ध गुन्हा दाखल करणे, खारफुटीची कत्तल रोखण्यासाठी तक्र ार निवारण प्रणाली तयार करणे याबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. त्याचप्रमाणे खारफुटी व्याप्त क्षेत्र वन विभागास हस्तांतरित करणेबाबतही त्यांनी सुचित केले आहे. तसेच सद्य स्थितीची पाहणी करून खारफुटी क्षेत्राचे नकाशे तयार करण्याची कार्यवाही करावी. हे नकाशे प्राप्त झाल्यानंतर ते क्षेत्र २००५ सालच्या पूर्वस्थितीमध्ये आणण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी असेही यावेळी आयुक्तांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त