शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ इमारतीवर कारवाई होणार , मुख्याधिका-यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 06:16 IST

अंबरनाथ येथील मटका चौकाजवळ मोकळ्या जागेत उभारण्यात आलेल्या तीन मजली बेकायदा इमारतीबाबत शुक्रवारच्या ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिध्द झाले होते. या वृत्ताची दखल घेत मुख्याधिकारी देविदास पवार यांनी लागलीच पालिकेच्या सर्वसाधारण सभेत या इमारतीवर कारवाई करण्याचे आदेश दिले.

अंबरनाथ  - येथील मटका चौकाजवळ मोकळ्या जागेत उभारण्यात आलेल्या तीन मजली बेकायदा इमारतीबाबत शुक्रवारच्या ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिध्द झाले होते. या वृत्ताची दखल घेत मुख्याधिकारी देविदास पवार यांनी लागलीच पालिकेच्या सर्वसाधारण सभेत या इमारतीवर कारवाई करण्याचे आदेश दिले.सर्वसाधारन सभा शुक्रवारी झाली. नगराध्यक्ष मनीषा वाळेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत नगरसेवकांनी शहरातील अनेक प्रश्नांवर प्रशासनाला धारेवर धरले. अतिक्रमणाबाबत पालिका सभागृहात चर्चाही झाली. याचवेळी ‘लोकमत’मध्ये प्रसिध्द झालेल्या तीन मजली इमारतीच्या अतिक्रमण आणि बेकायदा बांधकामाचा विषयही चर्चेला आला. पालिका प्रशासनाने अतिक्रमणाबाबत अधिकाºयांवर जबाबदारी निश्चिती केली आहे. असे असतानाही हेच अधिकारी बेकायदा बांधकामांना संरक्षण देत असल्याचा आरोप नगरसेवकांनी सभागृहात केला. तसेच मटका चौकात उभारण्यात आलेली तीन मजली इमारतीला कोणत्या अधिकाºयांचा आशीर्वाद आहे याबाबत खुलासा करावा अशी मागणी नगरसेवकांनी केली. यावर मुख्याधिकारी पवार यांनी लागलीच या इमारतीबाबत निर्णय घेत कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले. तसेच अधिकाºयांनाही या संदर्भात ताकीद देण्यात येईल असे स्पष्ट केले. बेकायदा बांधकामावरून नगरसेवकांनी अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरले.दरम्यान, पालिका सभागृहात विकासकामांच्या मुद्यावरही वाद निर्माण झाले. वर्षभरापूर्वी प्रभागातील कामांसाठी ३० लाखांचे प्रत्येक नगरसेवकाचे विषय घेतले होते. मात्र त्या विषयांची निविदाच काढलेली नाही. कोट्यवधींची कामे प्रशासन करत असताना प्रभागातील कामांबाबत प्रशासन गंभीर नसल्याचा आरोप काँग्रेसचे गटनेते प्रदीप पाटील आणि भाजपाच्या गटनेत्या अनिता आदक यांनी केला.आधीचेच ३०लाखांचे विषय प्रलंबित असताना पुन्हा प्रत्येक नगरसेवकाला ७० लाख ते १ कोटींचे विषय नव्याने घेतले आहेत. त्या विकास कामांसाठी प्रशासनाकडे कोणताच निधी नसताना विषय आलेच कसे असा अक्षेप नगरसेवकांनी घेतला. निधीची पूर्तत: ज्या प्रमाणात होईल त्याप्रमाणे कामे केले जातील असे नगराध्यक्ष वाळेकर यांनी स्पष्ट केले.रुग्णवाहिका पालिकेने विकत घेतल्यावर त्याची योग्य देखरेख होत नाही. त्यामुळे ही रुग्णवाहिका कंत्राटदारामार्फत भाडेतत्वावर मागवण्याची मागणी राजेंद्र वाळेकर यांनी केली. पालिकेला रुग्णवाहिका चालवण्यासाठी येणारा खर्च पाहता त्याच्या निम्या किमतीत कंत्राटदाराकडून रुग्णवाहिका घेता येणे शक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.रुग्णवाहिकेसोबत शववाहिनीही भाड्याने घेण्यास सभागृहाने मंजुरी दिली.सीसीटीव्ही लावण्यास मंजुरीपालिका कार्यालय आणि शहरातील महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी २५ लाखांची मंजुरी घेण्यात आली.वडोल गावातील मलनिस्सारण प्रकल्पाच्या ठिकाणी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी उल्हासनगर महापालिकेला जागा उपलब्ध करुन देण्यास मंजुरी दिली.

टॅग्स :cctvसीसीटीव्हीnewsबातम्या