शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण विभागाची कारवाई ‘अर्थ’पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 01:04 IST

सध्या २७ गावांचा परिसर आणि अन्य प्रभागांमध्ये आरक्षित जागांवरील बांधकामांवर तसेच अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेचे अतिक्रमण विभाग नियंत्रण अधिकारी सुनील जोशी यांनी कंबर कसली आहे;

डोंबिवली : सध्या २७ गावांचा परिसर आणि अन्य प्रभागांमध्ये आरक्षित जागांवरील बांधकामांवर तसेच अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेचे अतिक्रमण विभाग नियंत्रण अधिकारी सुनील जोशी यांनी कंबर कसली आहे; पण त्यामध्ये त्यांचे आर्थिक हितसंबंध दडले आहेत का, असा गंभीर सवाल कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी केला. अनधिकृत बांधकामांवर कारवाई निश्चित झाली पाहिजे; पण अनधिकृत बांधकामे उभी होत असताना महापालिकेचे अधिकारी झोपेचे सोंग घेत होते का? ज्यांच्या आशीर्वादाने ही बांधकामे उभी राहीली, त्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर तातडीने निलंबन किंवा बडतर्फीची कारवाई का केली जात नाही, असे सवालही आ. गायकवाड यांनी केले.महापालिकेच्या कारवाईसंदर्भात गायकवाड यांनी ‘लोकमत’जवळ संतप्त भावना व्यक्त केली. अनधिकृत कामे रातोरात होत नाहीत. प्रभाग अधिकाºयांसह अन्य वरिष्ठ अधिकाºयांच्या वरदहस्त असल्याशिवाय टोलेजंग इमारतींची बांधकामे पूर्ण होवू शकत नाहीत. त्यामुळे यासाठी ते अधिकारीदेखील तेवढेच जबाबदार आहेत. अनधिकृत बांधकामे जिथे झाली आहेत, तेथील संबंधित अधिकारी, कर्मचाºयांना तात्काळ बडतर्फ करुन त्यांची उच्चस्तरीय चौकशी करणे गरजेचे आहे. बांधकामे झाल्यावर कारवाईची वेळ आली की अधिकारी सर्वसामान्यांच्या जीवाची घालमेल बघत आनंद लुटतात. तिथे रहायला आलेल्या सर्वसामान्यांनी त्यांच्या आयुष्याची पुंजी पणाला लावलेली असते. काटकसर करून ते घर घेतात. अनधिकृत घरे घेताना त्यांचीही चूक असली, काहीसे स्वस्तात घर मिळत असल्याने फसव्या जाहिरातींच्या भुलभुलैय्यात ते अडकतात. वास्तविक अधिकाºयांच्या कामचुकारपणाचा, अर्थपूर्ण स्वार्थाचा फटका त्या सर्वसामान्य नागरिकांना बसतो.गेल्या काही दिवसांपासून महापालिकेने पाठवलेल्या कारवाईच्या नोटीसांमुळे सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले असून ते तणावाखाली आहेत. आपण बेघर होणार की काय, या भावनेने ते भयभीत झाले आहेत. बांधकाम व्यावसायिकांनी इमारती बांधल्या, विकल्या आणि आता ते हात वर करतील हे सर्वश्रूत आहे. त्यामुळे ज्यांची घरे आहेत त्यांना कुणी वाली नाही. ज्यांनी पैसे गुंतवले ते बेघर होणार आहेत.आगामी काळात अशी बांधकामे होणार नाहीत, यासाठीही ठोस कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. जोशी हे नोटीस बजावत असल्याने सर्वसामान्य नागरिक दडपणाखाली असून, सर्वसामान्यांच्या जीवावर मस्तवाल झालेले बांधकाम व्यावसायिक व अधिकाºयांना अभय का, असा सवाल त्यांनी केला. केवळ कारवाईच्या नोटीशीद्वारे दडपण तयार करून बांधकाम व्यावसायिक तडजोडीसाठी येतील याची जोशींना अपेक्षा आहे का, असा आरोपही गायकवाड यांनी केला.>अतिक्रमण झालेल्या ठिकाणी आयुक्त गोविंद बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई सुरू आहे. आरक्षित जागांवर तसेच रस्त्याच्या नियोजनात बाधा येत असल्यास संबंधित बांधकामांवर कारवाई अटळ आहे. जेथे आता अनधिकृतपणे बांधकाम होत आहे, अशा बहुतांश ठिकाणी कारवाई होणारच. अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी कारवाई सुरू आहे. त्यात अर्थपूर्ण उद्देश असण्याचा प्रश्नच नाही. जी अनधिकृत बांधकामे झाली किंवा होत असतील, त्या अधिकाºयांवर कारवाई करण्याचा मला अधिकार नाही. - सुनील जोशी, केडीएमसी

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका