शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरातील कल्याण-अंबरनाथ रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यावर धडक कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2023 17:55 IST

कारवाई दरम्यान कार विक्रेते, गॅरेजमालक व कार डेकोरेटर यांच्यावर कारवाई करुन, २३ हजार ५०० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. तसेच रस्त्यांवर ठेवलेले साहित्य जप्त करण्यात आले.

उल्हासनगर : शहरातून जाणाऱ्या कल्याण-अंबरनाथ रस्त्यावर वाहने व विविध वस्तू विक्रीसाठी ठेवणाऱ्या कार विक्रेते, कार डेकोरेटर, गॅरेजवाल्यासह इतर दुकानदारावर महापालिकेने सलग दोन दिवस धडक कारवाई केल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली. यानंतरही अशी कारवाई सुरू ठेवण्याचे संकेत लेंगरेकर यांनी दिले आहे.

उल्हासनगरातून जाणाऱ्या मुख्य कल्याण - अंबरनाथ रस्त्यावर वाहन व विविध वस्तू विकणाऱ्या दुकानदारांनी बस्थान बसविले. याचा परिणाम वाहतूक कोंडी व लहान मोठ्या अपघातात झाला. याबाबत असंख्य तक्रारी आयुक्त अजीज शेख यांच्याकडे आल्यावर आयुक्तांनी प्रभाग अधिकारी गणेश शिंपी, दत्तात्रय जाधव, जेठानंद करमचंदानी व अनिल खतुरानी यांच्या पथकांनी वाहतुकीस अडथळा करणा-या कार विक्रेते, कार डेकोरेटर गॅरेज मालक व इतर दुकानदार यांचे विरुद्ध बुधवारी व गुरवारी अशी सलग दोन दिवस कारवाई केली.

 कारवाई दरम्यान कार विक्रेते, गॅरेजमालक व कार डेकोरेटर यांच्यावर कारवाई करुन, २३ हजार ५०० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. तसेच रस्त्यांवर ठेवलेले साहित्य जप्त करण्यात आले. यापुढे रस्त्यावर वाहने उभी न करण्यासाठी कार विक्रेते, गॅरेजमालक व इतरांना सक्त ताकीद देण्यात आलेली आहे. सहा महिन्यात २ लाख १९ हजाराचा दंड शहरातील मुख्य रस्ते, चौक, पदपथ आदी ठिकाणी अतिक्रमण करणारे फेरीवाले, बेकायदा वाहन पार्किंग तसेच रस्त्यावरील कार विक्रीसाठी अनधिकृतपणे वाहने उभी करणा-या विरोधात महापालिकेने धडक करवाई केली. गेल्या सहा महिन्यात २ लाख १९ हजार ९५० रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनीं दिली आहे. तसेच ही कारवाई सुरू ठेवण्याचे संकेत त्यांनी दिले आहे. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरEnchroachmentअतिक्रमणambernathअंबरनाथ