शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत मुदतबाह्य खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांवर कारवाई,७१ हजारांचे साहित्य जप्त

By नितीन पंडित | Updated: April 14, 2023 17:06 IST

भिवंडी : भिवंडी शहरातील गरीब झोपडपट्टी विभागात मोठ्या प्रमाणावर मुदतबाह्य असलेले खाद्यपदार्थ विक्री केले जात असून त्याबाबत अनेकदा तक्रारी ...

भिवंडी: भिवंडी शहरातील गरीब झोपडपट्टी विभागात मोठ्या प्रमाणावर मुदतबाह्य असलेले खाद्यपदार्थ विक्री केले जात असून त्याबाबत अनेकदा तक्रारी होत असल्याची माहिती समोर आली होती. यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाने गुरुवारी मुदतबाह्य खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या एका दुकानावर कारवाई करीत ७१ हजारांचे साहित्य जप्त केले आहे.

अन्न व औषध प्रशासनातील अन्न निरीक्षक माणिक जाधव व रामलिंग बोडके यांना भिवंडी शहरातील जैतूनपुरा येथील शमीम अपार्टमेंट येथे सुरू असलेल्या सुपरमार्केट दुकानात अब्दुल हमीद अब्दुल कय्युम अन्सारी हे मोठ्या प्रमाणावर मुदतबाह्य साहित्य विक्री केले जात असल्याची माहिती मिळाल्याने त्या ठिकाणी छापा टाकला. त्या दुकानात गार्डन नायलॉन शेव,ब्ल्यू बर्ड आईस्क्रीम मिक्स,क्रीम बिस्कीट्स,मोन्याको बिस्कीट्स,लिज्जत पापड, चहा पावडर, शाही पनीर यांसह अनेक खाद्य पदार्थ मुदतबाह्य होऊनही विक्री करीत असल्याचे आढळून आले. अन्न निरीक्षकांनी या कारवाईत तब्बल ७१ हजार ७५० रुपये किमतीचा साठा जप्त केला आहे.हा सर्व साठा पालिकेच्या परवानगीने डंपिंग ग्राउंड वर नष्ट केला जाणार आहे अशी माहिती अन्न निरीक्षक माणिक जाधव यांनी दिली आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भिवंडी शहरात प्रशासनाच्या वतीने नियमित कारवाई करीत असल्याची माहिती अन्न निरीक्षक रामलिंग बोडके यांनी दिली. आठवड्याभरात शहरातील रांजनोली येथील अमंत्रा कॉम्प्लेक्स येथील जिगर भानुशाली यांच्या जिया एंटरप्रायझेस दुकानांवर कारवाई करीत १२ हजार ५३० रुपयांचा मुदतबाह्य अन्न पदार्थांचा साठा जप्त केला. तर कोणार्क अर्केड येथील रिलायन्स रिटेलच्या स्मार्ट पॉइंट दुकानातील खाद्यपदार्थांच्या साहित्याची तपासणी केली.

नागरिकांनी स्वस्त मिळते म्हणून खाद्य पदार्थ खरेदी करण्यापूर्वी खाद्यपदार्थ हे वापरण्यास योग्य असल्याची खात्री करून घ्यावे व आपल्या आरोग्याशी खेळू नये असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे .

टॅग्स :bhiwandiभिवंडी