शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे महापालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामांवर कारवाई!

By अजित मांडके | Updated: January 10, 2024 23:22 IST

दिवा क्षेत्रात, जिवदानी नगर, प्रियदर्शनी अपार्टमेंटजवळ एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावर कारवाई करण्यात आली.

 ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मंगळवारी दिवा, मुंब्रा, कळवा, मानपाडा या भागात अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. इमारती, अनधिकृत गाळे, बैठे बांधकाम यांच्यावर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथक आणि प्रभाग समितीनिहाय पथकांनी ही कारवाई केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार, ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाईची धडक मोहीम सलगपणे राबविण्यात येणार आहे.

दिवा क्षेत्रात, जिवदानी नगर, प्रियदर्शनी अपार्टमेंटजवळ एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावर कारवाई करण्यात आली. तसेच,  दिवा पूर्व येथील दत्त मंदिराच्या शेजारी असलेल्या इमारतीच्या सहाव्या मजल्याचा स्लॅब तोडण्यात आला. शिबलीनगर गेटच्या समोर दोन मजली बांधकाम पाडण्यात आले. एमएस कम्पाऊंडमधील दोन मजल्यांच्या वर कॉलम असलेल्या तीन इमारतींवर कारवाई करण्यात आली.

मुंब्रा येथे नताशा चाळ येथे एक मजली बांधकाम निष्कासित करण्यात आले. कळवा येथे कुंभार आळीत एका तळमजल्याचे आरसीसी स्लॅब व दुसऱ्या मजल्याच्या स्लॅबसाठी उभारण्यात आलेले सेंट्रीग व स्टील काढण्यात आले. तसेच, विटावा गणेश विसर्जन घाट येथे तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याचे स्लॅब ब्रेकर मशीनच्या सहाय्याने तोडण्यात आले. माजिवडा-मानपाडा भागात कासारवडवली येथे रत्नतेज इमारतीजवळील बैठे बांधकाम, तीन गाळ्यांचे वाढीव बांधकाम काढण्यात आले.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका