शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

अनाधिकृत बांधकामावर केडीएमसीची कारवाई, स्थानिकांनी केला विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 18:34 IST

आयरे गाव परिसरातील ३१ खोल्यांसह १७ चाळींची प्लिंथची अनधिकृत बांधकामे तोडण्यात आली. त्यावेळी स्थानिकांसह रहिवाशांनी कारवाईला प्रचंड विरोध केला.

डोंबिवली: आयरे गाव परिसरातील अनधिकृत बांधकामांवर ग प्रभागक्षेत्र अधिकारी परशुराम कुमवात यांनी बुधवारी संध्याकाळी पाडकाम कारवाई केली. त्या कारवाईमध्ये त्या परिसरातील ३१ खोल्यांसह १७ चाळींची प्लिंथची अनधिकृत बांधकामे तोडण्यात आली. त्यावेळी स्थानिकांसह रहिवाशांनी कारवाईला प्रचंड विरोध केला.

कुमावत यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यासंदर्भात आयुक्त गोविंद बोडके, उपायुक्त सुनिल जोशी यांच्याकडे तक्रारी गेल्या होत्या. त्याची दखल घेत आयुक्तांनी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जोशींच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. त्यावेळी स्थानिकांचा प्रचंड असंतोष झाल्याने काही काळ स्थिती तणावाची झाली होती. 

चाळींची बांधकामे करण्यासाठी प्लिंथचे काम करण्यासाठी करण्यात आले होते. त्या कच्च्या बांधकामांवर तातडीने कारवाई करण्यात आली. दोन, तीन चाळी मिळून ३१ खोल्या तोडण्यात आल्या असून तेथे पूर्ण बांधकामे झाली होती. महापालिकेच्या २५  पोलिस अधिकारी व कर्मचारी, तसेच एक जेसीबी अतिक्रमण विभागाचे २५ कर्मचारी यांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली. फ प्रभागक्षेत्र अधिकारी अरूण भालेराव तसेच ई प्रभागाचे अधिकारी यांचेही सहकार्य मिळाल्याचे कुमावत यांनी सांगितले. 

दोन दिवसांपूर्वीच पश्चिमेतील देवीचापाडा, गोपी चौक येथेही ह प्रभागक्षेत्र अधिका-यांनी अनधिकृत बांधकांवर हातोडा मारला होता. त्यापाठोपाठ ग प्रभागात झालेल्या अनधिकृत कारवाईची शहरात चर्चा सुरू आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका