शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात हुक्कापार्लर, बेकायदा हॉटेलच्या बांधकामांवर कारवाई; ठामपाचा हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 23:45 IST

लाकडी मचान, बांबू ताडपत्रीचे शेड पाडले 

ठाणे : ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी शहरातील अनधिकृत हॉटेल्सची बांधकामे, हुक्कापार्लरवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर गुरुवारी माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीमधील नागलाबंदर, रेतीबंदर जी.बी. रोड येथील हुक्कापार्लर तसेच अनधिकृत हॉटेल्सवर धडक कारवाई करून शेडचे बांधकाम निष्कासित करण्यात आले.

महापालिकेच्या माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीमध्ये अनधिकृत हुक्कापार्लर सुरू असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी पत्राद्वारे कळविल्यानंतर आयुक्तांनी तत्काळ कारवाई करण्याचे आदेश अतिक्रमण विभागास दिले होते. त्यानुसार गुरुवारी मौजे नागलाबंदर, रेतीबंदर जी.बी. रोड येथील पिंक बाबा हॉटेलच्या शेडचे बांधकाम, पाच लाकडी मचान व बांबू ताडपत्री शेडचे बांधकाम निष्कासित करण्यात आले. 

ओवळा येथील ब्लुरुफ वेलवेट गार्डन या हॉटेलच्या शेडचे बांधकाम तसेच नाका हॉटेलच्या शेडचे बांधकाम निष्कासित करण्यात आले. ही कारवाई महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण आणि निष्कासन विभागाचे उपायुक्त अशोक बुरपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त डॉ. अनुराधा बाबर यांच्यासह अतिक्रमण विभागाचे कर्मचारी तसेच महापालिकेच्या अधिकृत ठेकेदाराचे २० मजूर, एक जेसीबी मशीन, दोन डम्पर इत्यादींच्या साहाय्याने करण्यात आली, असे सूत्रांनी सांगितले.

दोन अतिधोकादायक इमारती जमीनदोस्तकल्याण : डोंबिवली पश्चिमेतील दोन अतिधोकादायक इमारती शुक्रवारी केडीएमसीच्या पथकाने आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार जमीनदोस्त केल्या. कोपर गाव व शिवमंदिर रोडवरील या दोन इमारती होत्या. शिवमंदिर रोडवरील अतिधोकादायक इमारत ४८ वर्षे जुनी होती. प्रभाग अधिकारी भारत पवार यांनी ही कारवाई केली. या दोन्ही इमारती जीर्ण झाल्या होत्या. त्यांच्या मालकीबाबत वाद असल्याने या इमारती वास्तव्याविना पडून होत्या. या इमारतींप्रकरणी नागरिकांच्या तक्रारी आल्या होत्या. या इमारतींना मनपाने यापूर्वीच अतिधोकादायकच्या नोटिसा बजावल्या होत्या.

 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका