शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथमध्ये फेरीवाल्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 23:52 IST

अंबरनाथच्या शिवाजी चौकात फेरीवाल्यांची दादागिरी दिवसागणिक वाढत आहे.

अंबरनाथ : अंबरनाथच्या शिवाजी चौकात फेरीवाल्यांची दादागिरी दिवसागणिक वाढत आहे. या दादागिरीला लगाम लावण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. अखेर उशिरा का होईना शुक्रवारी पालिकेने पोलीस बंदोबस्तात फेरीवाल्यांवर कारवाई करत शिवाजी चौक मोकळा केला. या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असले तरी अशा प्रकारची कारवाई सातत्याने करावी अशी मागणी पालिकेकडे करण्यात येत आहे.शिवाजी चौकातील फेरीवाल्यांमुळे नागरिकांना आणि वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत होता. अनेक फेरीवाले रस्त्याच्याबाजूला राहून व्यवसाय करत असल्याने इतर वाहनांसाठी जागा शिल्लक राहत नव्हती. या फेरीवाल्यांची मुजोरी वाढल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सातत्याने होत होती. मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशालाही बगल देत काही फेरीवाले हे स्टेशन परिसरापासून १०० मीटरच्या अंतरावरच बसत होते. १०० मीटरपर्यंत एकाही फेरीवाल्यांना बसण्याची परवानगी नसतांनाही अनेक फेरीवाले हे स्टेशन परिसरातच बसतात. त्यांच्यावर कारवाई करत पालिकेच्या अतिक्रमण विभागाने स्टेशन चौकातील सर्व हातगाड्या जेसीबीच्या मदतीने तोडण्यात आल्या. या हातगाडींवर अनेकवेळा दंड आकारूनही त्या गाड्या पुन्हा आहे त्याच ठिकाणी उभ्या राहत असल्याने त्यांच्यावर कायमची कारवाई करण्यात आल्याचे मुख्याधिकारी देविदास पवार यांनी स्पष्ट केले. या कारवाईनंतर काही फेरीवाल्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र स्टेशन परिसरात १०० मीटरपर्यंत कुणालाच बसण्याचा अधिकार नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :hawkersफेरीवालेambernathअंबरनाथ