शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

धोकादायक इमारतींवरील कारवाई नोटिशींपुरतीच मर्यादित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 01:05 IST

ठोस कारवाई नाही : मालक-भाडेकरू वाद ठरतोय कळीचा मुद्दा

कल्याण: दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जाते. अतिधोकादायक इमारतींवर ठोस कारवाई होणे अपेक्षित असताना, ती केवळ नोटिशीपुरतीच मर्यादित राहत आहे. बहुतांश ठिकाणी असलेले मालक-भाडेकरू वाद या परिस्थितीला कारणीभूत ठरत आहेत. डोंबिवलीत गुरूवारी एका मोडकळीस आलेल्या इमारतीचे सज्जे कोसळल्याची घटना घडल्याने कमकुवत बांधकाम असलेल्या इमारतींचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

कल्याण-डोंबिवलीत यंदा धोकादायक बांधकामे २८२, तर अतिधोकादायक बांधकामे १९१ आहेत. जुलै २०१५ मध्ये ठाकुर्ली परिसरातील मातृकृपा ही धोकादायक इमारत कोसळल्याची घटना घडली होती. ऐन पावसाळ्यात घडलेल्या या घटनेत ९ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेतून केडीएमसीने कोणताही धडा घेतलेला नाही. त्यामुळे धोकादायक बांधकामामध्ये राहणाऱ्या नागरिकांचा जीव आजही टांगणीला आहे. महापलिका क्षेत्रातील धोकादायक आणि अतिधोकादायक बांधकामांचा यंदाचा एकत्रित आकडा ४७३ इतका आहे. मागील वर्षी हा आकडा ४६३ होता. यंदा हा आकडा वाढला आहे. धोकादायक बांधकामांवर कारवाई सुरू असल्याचा दावा महापालिका दरवर्षी करते; मात्र धोकादायक अवस्थेत असलेल्या बांधकामांवर करवाई होत नाही, हीदेखील वस्तुस्थिती आहे. काही जुन्या आणि जीर्ण अवस्थेतील इमारतींना स्ट्रक्चरल आॅडीटची नोटीस महापालिकेकडून बजावली जाते. पण पुढे खरेच आॅडीट होते का, याकडेही दुर्लक्ष केले जाते. गुरूवारची घटना याचे ताजे उदाहरण आहे. या दुर्घटनेत सुदैवाने कुणीही जखमी झाले नसले तरी त्यामुळे धोकादायक इमारतींच्या मुद्याचे गांभीर्य नक्कीच कमी होत नाही. २0१५ सारख्या आणखी एखाद्या मोठ्या दुर्घटनेला सामोरे जाण्याऐवजी पालिकेने आताच याप्रकरणी ठोस भूमिका घेण्याची गरज आहे.यंदाच्या धोकादायक बांधकामांची माहिती घेतली असता, सर्वाधिक धोकादायक बांधकाम कल्याणमधील क प्रभागात असल्याचे उघड झाले. इथे अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतींची एकूण संख्या १५३ आहे. त्याखालोखाल डोंबिवलीतील फ प्रभागात अशा इमारतींची संख्या अधिक आहे. अतिधोकादायक आणि धोकादायक मिळून हा आकडा १५१ आहे. त्यापाठोपाठ ह प्रभागात ही संख्या ५० आहे. ग प्रभागात ४५, जे मध्ये ३५, ब प्रभागात २१, अ प्रभागामध्ये ८, तर ड प्रभागात ७ आणि आय, ई प्रभागात हा आकडा अनुक्रमे २ आणि १ असा आहे.कारवाईत येतात हे अडथळेधोकादायक बांधकामांवर कारवाई करताना अनेक अडथळेही येत असतात. एकीकडे जीव मुठीत घेऊन राहावे लागत असले तरी, दुसरीकडे ही कारवाई रोखण्यात बहुतांश वेळा रहिवाशीच कारणीभूत ठरत असतात. जोपर्यंत पुनर्वसन केले जात नाही, तोपर्यंत घरे खाली न करण्याचा त्यांचा पवित्रा असतो. त्यातच मालक-भाडेकरू वाद हा मुद्दाही कारवाईत अडथळा ठरतो. ज्या ठिकाणी मोठया प्रमाणावर रहिवाशी राहतात तेथे कारवाईला मर्यादा येतात. काही बांधकामाचे वाद हे न्यायप्रविष्ट असल्याने अशांवर कारवाई करता येत नाही. त्यामुळे धोकादायक असो अथवा अतिधोकादायक बांधकामांचा मुद्दा जैसे थेच राहतो. 

टॅग्स :thaneठाणेBuilding Collapseइमारत दुर्घटना