शहरं
Join us  
Trending Stories
1
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
2
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
3
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
4
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
5
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
6
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
7
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
8
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
9
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
10
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
11
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
13
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
14
दीड लाख जागांसाठी अवघे ५० हजार प्रवेश; आयटीआयच्या दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद
15
"मला कॉमेडी करावी लागली पण मी कॉमेडियन नाहीए", असं का म्हणाले अशोक सराफ?
16
१० सेकंदाच्या व्हिडीओनं अब्जाधीश कंपनीच्या सीईओंनी गमावलं पद, पत्नीनेही उचललं मोठं पाऊल!
17
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
18
गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष ट्रेन; विविध मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या धावणार!
19
गणेश नाईक यांनी पुन्हा शिंदेंना केले लक्ष्य; औषध, ऑक्सिजन चोरीस नगरविकास खातेच जबाबदार
20
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 

बेकायदा उत्खनन प्रकरणी कारवाई

By admin | Updated: May 6, 2016 00:58 IST

काशिमीरा येथील डी. बी. रियालिटीच्या नियोजित बांधकाम प्रकल्पाच्या जागेत बेकायदा उत्खनन केल्याप्रकरणी बुधवारी मंडळ अधिकारी व तलाठी यांनी घटनास्थळाहून दोन पोकलन

मीरा रोड : काशिमीरा येथील डी. बी. रियालिटीच्या नियोजित बांधकाम प्रकल्पाच्या जागेत बेकायदा उत्खनन केल्याप्रकरणी बुधवारी मंडळ अधिकारी व तलाठी यांनी घटनास्थळाहून दोन पोकलन यंत्र सील केली. तब्बल सहा हजार ३५८ ब्रास उत्खनन करण्यात आले. मुंबई- अहमदाबाद महामार्गावर ठाकूर मॉलजवळ सर्वे क्र. ९२ ही जमीन इस्टेट इन्वेस्टमेंट कंपनीच्या नावे आहे. डी. बी. रियालीटीने या ठिकाणी विकासकाम प्रस्तावित केले आहे. या जागेतून विकास आराखड्यातील रस्ता जात असल्याने तो विकसक विकसीत करुन देणार आहे. त्याचा मोबदला पालिका टीडीआरच्या माध्यमातून विकसकास देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. हे ठिकाण डोंगराळ भागात असल्याने रस्ता व इमारत बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरु होते. ही बाब मंडळ अधिकारी पवार व तलाठी अभिजीत बोडके यांच्या निदर्शनास आली. त्यांनी घटनास्थळी जाऊन कारवाई केली. या ठिकाणी ६,३५८ ब्रास इतके दगड व मातीचे उत्खनन झाले आहे. पवार यांनी दोन्ही पोकलेन यंत्रे सील केली आहेत. उत्खननातील सुमारे ९७७ ब्रास माती दगड जवळच्याच जागेत टाकले आहे. या प्रकरणी तहसीलदार यांना अहवाल पाठवला असून त्यांच्याकडून आदेश येताच त्यानुसार दंडात्मक कारवाई केली जाईल असे पवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल उत्खन्नाच्या ठिकाणी मोठी व जुनी झाडे होती. काही झाडे सुकली आहेत. तर अनेक मोठी व जुनी झाडे कापली आहेत.वास्तविक मोठी व जुनी झाडे कापण्याची फारच गरज असल्यास त्याची परवानगी महापालिकेचा वृक्ष प्राधिकरण विभाग देतो. येथील झाडांच्या कत्तलीबाबत पालिकेच्या वृक्ष विभागाचे हंसराज मेश्राम यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.