शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

कल्याण पूर्वेतील आदिवली व ढोकली येथे ५२ वीज चोरांविरुद्ध कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 6:08 PM

बिल्डरकडून बनावट मीटरद्वारे सदनिकाधारकांना वीज 

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली: महावितरणच्या कल्याण पूर्व विभागातील उपविभाग एक अंतर्गत मंगळवार व बुधवारी ५२ वीज चोरांविरुद्ध धडक कारवाई करण्यात आली. तेथील दोन सोसायट्यांमधील दहा इमारतींमध्ये झालेल्या कारवाईत बिल्डरकडून बनावट मीटरद्वारे तसेच कांही ठिकाणी मीटरशिवाय सदनिकाधारकांना थेट वीजपुरवठा केल्याचे आढळून आले.

कल्याण पूर्व उपविभाग एकचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता जितेंद्र प्रजापती यांच्या नेतृत्वाखाली त्या इमारतींच्या ३६० सदनिकांच्या वीज पुरवठ्याची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ५२ वीज चोरट्यांनी जवळपास ८ लाख २० हजार किंमतीची ८२ हजार युनिट वीज चोरून वापरल्याचे निष्पन्न झाले. चोरून वापरलेल्या विजेचे देयक दंडासह भरण्याच्या नोटीसा संबंधितांना देण्याचे काम सुरू आहे. त्यानुसार देयक व दंडाचा भरणा न करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाईसाठी फिर्याद देण्यात येईल.

या कारवाईत बिल्डरच्या माध्यमातून बनावट मीटरद्वारे पाच ठिकणी तर इतर ठिकाणी विजेचा थेट चोरटा वापर आढळून आला. वीज चोरांविरुद्धची मोहीम नियमितपणे सुरु राहणार असून कारवाई टाळण्यासाठी अधिकृत वीजजोडणी घेऊनच विजेचा वापर करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे. तांत्रिक या अतांत्रिक कर्मचाऱ्यांच्या १५ जणांच्या पथकाने ही कामगिरी केली. 

टॅग्स :mahavitaranमहावितरण