शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

मद्य पिऊन वाहन चालविणाऱ्या १०४५ जणांवर कारवाईचा बडगा; १६ वर्षाखालील २६ वाहन चालकांवर कारवाई

By अजित मांडके | Updated: May 29, 2024 17:36 IST

ठाण्यात बेकायदेशीर हॉटेल्स आणि बेकायदेशीर ढाबे सरासपणे सुरु आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी मद्य प्राशन करुन वाहन चालविणे हे अगदी नित्याचेच झाले आहे.

ठाणे : पुण्यात घडलेल्या घटनेनंतर ठाण्यातही वाहतूक पोलीस आता कामाला लागले आहेत. परंतु मागील चार महिन्यात वाहतुक पोलिसांनी पोलीस आयुक्तालयात मद्य पिऊन वाहन चालविणाऱ्या १०४५ जणांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून ४० लाख ८५ हजारांचा दंडही वसुल केला आहे. याशिवाय १६ वर्षाखालील २६ जणांवर कारवाई करीत १ लाख ३० हजारांचा दंड वसूल केला असल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली आहे.

ठाण्यात बेकायदेशीर हॉटेल्स आणि बेकायदेशीर ढाबे सरासपणे सुरु आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी मद्य प्राशन करुन वाहन चालविणे हे अगदी नित्याचेच झाले आहे. परंतु आता पूण्यात घडलेल्या घटनेनंतर पोलीस यंत्रणा देखील कामाला लागली आहे. ठाण्यात देखील वाहतूक पोलिसांनी मागील चार महिन्यात मद्य प्राशन करुन वाहन चालविणे, हिट अ‍ॅण्ड रणचे अपघात, १६ वर्षाखालील वाहन चालक आणि ज्याच्याकडे लायसन्स नाही, तरी सुध्दा त्याला वाहन चालविण्यास देणाऱ्यांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यातही ठाणे पोलीस आयुक्तालयात १६ वर्षाखालील तरुण, तरुणी देखील वाहने चालवित असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाई नंतर प्रकर्शाने समोर आली आहे. त्यामुळे या बाबतीत पालकही त्याला तितकेच जबाबदार असल्याचे अधोरेखीत झाले आहे. १६ वर्षाखालील २६ वाहन चालविणाºयांवर कारवाई करीत १ लाख ३० हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

दुसरीकडे, वाहन मालक वेगळा आणि त्याचे वाहन चालविणाऱ्याकडे लायसेन्स नसल्यांवर देखील कारवाई करण्यात आली आहे. यात तब्बल २९५ जणांवर जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात कारवाई करुन १४ लाख ६५ हजारांचा दंड वसुल करण्यात आला आहे. याशिवाय मद्य पिउन वाहन चालविणाऱ्यांच्या विरोधात देखील कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून चार महिन्यात १०४५ जणांवर कारवाई करीत त्यांच्याकडून ४० लाख ८५ हजारांचा दंड वसुल करण्यात आला आहे. याच चार महिन्यांच्या कालावधीत हिट अ‍ॅण्ड रनच्या देखील केसस दाखल झाल्या असून ज्यात ३४ अपघात झाले असून त्यात ३६ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

ठाणे शहरात विविध ठिकाणी वाहतूक पोलिसांची नाकाबंदी आणि तपासणी सुरु असतानाही मद्यप्राशन  करून दुचाकी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवून फिरणाऱ्या दुचाकी, कर्कश आवाजाचे सायलेन्सर लावून फिरणाऱ्या दुचाकी, चारचाकी आदी वाहन चालक हे नाकाबंदीला हुलकावणी देत शहरभर फिरताना आढळतात. हाच प्रकार महामार्गावर देखील असल्याने अपघातात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत २०२३ या वर्षात ४८२ अपघात झाले. तर त्यात २०२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.