शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

हातोडा दाखवून तिच्या मित्रांना पळवलं; शिर्डीहून आलेल्या मुलीसोबत वेगळच घडलं, ठाणे हादरलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2021 12:07 IST

मुंबई, पुणे, अमरावती पाठोपाठ आता ठाण्यातील उल्हासनगरमध्ये देखील बलात्काराची घटना घडली आहे.

मुंबई/ठाणे: मुंबई, पुणे, अमरावती पाठोपाठ आता ठाण्यातील उल्हासनगरमध्ये देखील बलात्काराची घटना घडली आहे. उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात एका नराधमाने 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी आरोपी दादा उर्फ श्रीकांत गायकवाड याला अटक केली आहे.

उल्हासनगर स्थानकास लागून असलेल्या स्कायवॉकवर ही पीडित अल्पवयीन मुलगी उभी होती. ही मुलगी शिर्डीहून कल्याण येथे एका खासगी बसने आली होती. स्कायवॉकवर तिला तिचेदोन मित्र भेटले. त्यावेळी एक तरुण तिच्या जवळ आला. त्याच्या हातात हातोडा होता. या हातोड्याचा वापर करत त्याने तिच्या मित्रांना धमकावले. त्यानंतर ते मित्र पळून गेले. त्यानंतर त्या तरुणाने तिला जबरदस्ती एका निर्जन स्थळी नेले. त्या ठिकाणी त्याने मुलीला बेदम मारहाण केली. नंतर तिच्यावर बलात्कार केला. 

बलात्कार केल्यानंतर आरोपी मुलीला घटनास्थळी तसेच सोडले आणि तो पळून गेला. काही वेळेनंतर पीडित मुलीने आपल्या मित्रांना फोन केला आणि आपल्यावर बलात्कार झाल्याची माहिती दिली. त्यानंतर मित्रांनी पोलीस स्थानकात धाव घेत सदर घटनेची माहिती पोलिसांना दिली. 

संबंधित घटनेची माहिती मिळताच कल्याण जीआरपीचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक वाल्मीक शादरुल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु झाला. पोलिसांनी या प्रकरणी नराधम आरोपी दादा उर्फ श्रीकांत गायकवाड याला अटक केली आहे. त्याने गुन्हा कबूल केला आहे. 

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळthaneठाणेulhasnagarउल्हासनगरPoliceपोलिस