शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

खंडणीतील आरोपीने पोलिसालाच चॉपरने हल्ला करण्याची दिली धमकी: एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 20:09 IST

कोपरी परिसरात खंडणी उकळणाऱ्या कृतिक उर्फ बंटी सितापराव (१८, रा. पारशेवाडी, कोपरी, ठाणे) याला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस अंमलदारावरच चॉपरने हल्ला करण्याची धमकी देत धक्काबुक्की केल्याची घटना नुकतीच घडली.

ठळक मुद्देकोपरी पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कोपरी परिसरात खंडणी उकळणाऱ्या कृतिक उर्फ बंटी सितापराव (१८, रा. पारशेवाडी, कोपरी, ठाणे) याला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस अंमलदारावरच चॉपरने हल्ला करण्याची धमकी देत धक्काबुक्की केल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी कृतिक याला अटक केल्याची माहिती कोपरी पोलिसांनी दिली.कृतिक याच्याविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात चार दिवसांपूर्वी खंडणी उकळल्याप्रकरणी तसेच हत्यार बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. याच गुन्हयात त्याला अटक करण्यासाठी कोपरी पोलीस ठाण्याचे पोलीस अमलदार नितीन चव्हाण हे त्याला कोपरी येथील जिजामाता उद्यानाजवळील गल्लीमध्ये गेले होते. त्यावेळी त्याने अटक टाळण्यासाठी कमरेला काढलेला चॉपर काढून तो हवेत फिरवत त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यात त्याला प्रतिकार करतांना कृतिक याने त्यांना धक्काबुक्की करीत सरकारी गणवेशाचे बटन तोडून शर्टही फाडला. याप्रकरणी चव्हाण यांनी कोपरी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणणे आणि भारतीय हत्यार कायद्याखाली ६ मार्च रोजी गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसुझा यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धोंडे आणि पोलीस उपनिरीक्षक एच. एम. वाघमारे यांच्या पथकाने त्याला ७ मार्च रोजी अटक केली आहे. 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक